21.9 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriरत्नागिरी सिव्हील हॉस्पीटलच्या दुरुस्तीसाठी १० कोटी निधी तातडीने उपलब्धतेचे निर्देश

रत्नागिरी सिव्हील हॉस्पीटलच्या दुरुस्तीसाठी १० कोटी निधी तातडीने उपलब्धतेचे निर्देश

या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी अत्यावश्यक आहेत त्या गोष्टी प्रामाणिकपणे करण्याचा आपला प्रयत्न आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी रत्नागिरी सिव्हील हॉस्पीटलला भेट दिली. त्यावेळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सद्या मोठ्या प्रमाणात पाणी गळती आणि दुरुस्तीची कामे तातडीने करण्याची आवश्यकता असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या दुरुस्तीसाठी प्राथमिक टप्प्यात १० कोटी निधी तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले आहेत. दोन मजली व सुमारे २२५ खाटांची क्षमता असलेल्या या प्रशस्त हॉस्पीटलमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची गळती मोठया प्रमाणावर आहे. तसेच हॉस्पिटलची डागडूजी देखील करण्याची आवश्यकता आहे.

चव्हाण यांनी या रुग्णालयाच्या भेटीनंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले की, रत्नागिरी मधील हे प्रमुख शासकीय रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये अनेक ठिकाणाहून विविध प्रकारचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. या रुग्णालयातील डॉक्टर्स हे चांगल्या पध्दतीने येथील रुग्णांना सेवा देत असून सर्व डॉक्टर्स आणि त्यांची मेहनत आपण कोविडच्या काळात प्रत्यक्ष डोळयाने पाहिलेली आहे. त्यामुळे त्यांनी चांगल्या वातावरणामध्ये आरोग्य सेवा करणे हे देखील फार महत्वाचे आहे, त्यामुळे आवश्यक सर्व सुखसोयी या ठिकाणी उपलब्ध असणे गरजेचे आहे असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.

त्यामुळे यामध्ये आपण स्वत: आणि स्थानिक आमदार व मंत्री उदय सामंत यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी सर्व जण मिळून यामध्ये अजून कशी सुधारणा होईल याकरिता प्रयत्न करु असेही प्रतिपादन केले. या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी अत्यावश्यक आहेत त्या गोष्टी प्रामाणिकपणे करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि ज्या जनतेच्या हिताच्या आहेत त्याला प्राधान्य देण्याच काम हे येणाऱ्या काळामध्ये आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आमचे सर्वांचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हेच सांगितलेलं आहे की, जे काम जनतेच्या हिताचे आहे ते प्राधान्याने करा.

दुरुस्तीची बाब ही खर्चीक असल्यामुळे ती दुर्लक्षित झाली असल्याची बाब ध्यानात आली आहे. परंतू, रत्नागिरी परिसरातील नागरिकांसाठी हे रुग्णालय अतिशय महत्वाचे असल्याने सदर रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी प्रथम पाऊल उचलणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular