28.2 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriरत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील १३ ड्यूरा सिलेंडर गायब !

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील १३ ड्यूरा सिलेंडर गायब !

या प्रकारातील एका सिलेंडरची किंमत अडीच ते तीन लाख रुपये इतकी आहे.

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात कोरोना काळामध्ये ऑक्सिजन पुरवठा करणारी लाखो रुपये किमतीची  ड्युरा सिलेंडर खरेदी करण्यात आली होतीत. परंतु आत्ता ते १३ ड्यूरा सिलेंडर गायब असून, हे नवीन गोलमाल प्रकरण उघडकीस आल आहे. हे १३ ड्युरा सिलेंडर नेमके गेले तरी कुठे याचा शोध घेणे गरजेचे असून याला जबाबदार असणार्‍या जिल्हा शल्य चिकित्सकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,  अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केली आहे.

जिल्हा रुग्णालय हे कोणत्या न कोणत्या कारणाने कायमच चर्चेत असते. या रुग्णालयाचा कारभार सर्वज्ञात आहे. मात्र असे असताना देखील काम करणार्‍या अधिकार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखविला जातो, बिनकामाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या मागेपुढे करणारे अधिकारी आणि कर्मचारी येथील लोकप्रतिनिधीप्रिय असल्याने याचाच फायदा घेत जिल्हा रुग्णालयात कोरोना काळात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहारदेखील झाल्याचे उघडकीस आले आहे.

ज्यांनी कोरोना काळात ऑक्सिजनचा पुरवठा केला त्या पुरवठादाराची लाखो रुपयांची बिले जाणूनबुजून अडकवून ठेवली आहेत. हे बिल अडकवून ठेवण्याचे कारण काय?  केवळ स्वतःचा वरचा फायदा मिळावा यासाठीच कोरोनामध्ये काम करणार्‍या अनेक आस्थापनांची बिले जिल्हा रुग्णालयाने मुद्दामहून अडकवून ठेवली आहेत.

आता तर १३ ड्युरा सिलेंडरचा गोलमाल पुढे आला आहे. हे ड्युरा सिलेंडर सध्या आहेत कुठे? या प्रकारातील एका सिलेंडरची किंमत अडीच ते तीन लाख रुपये इतकी आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे तेराही सिलेंडर जिल्हा रुग्णालयाच्या ताब्यामध्ये नाहीत, मग गेले कुठे ! काय आहे यामागचा गोलमाल?  असा रोखठोक सवाल अनिकेत पटवर्धन यांनी उपस्थित केला आहे.

ज्यावेळी ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते त्यावेळी या ड्युरा सिलेंडरचा वापर केला जातो. मात्र हे १३ सिलेंडर सध्या शासकीय रुग्णालयातून गायब असून, स्वत:चे नाव त्यांमध्ये येऊ नये म्हणून  जिल्हा शल्य चिकित्सक सर्व जबाबदारी कर्मचार्‍यांवर ढकलून मोकळे झाले आहेत. खरंतर याप्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी, जिल्हा शल्य चिकित्सकांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular