28.7 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeRatnagiriरत्नागिरी शहराच्या हवा प्रदूषण मापन प्रकल्पाचे कामकाज सुरु- डॉ. पाटील

रत्नागिरी शहराच्या हवा प्रदूषण मापन प्रकल्पाचे कामकाज सुरु- डॉ. पाटील

मुंबईतील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अनुदानातून रत्नागिरी शहराच्या हवा प्रदूषण मापन प्रकल्पाचे कामकाज सुरु झाले आहे. मुंबई विद्यापीठा अंतर्गत येणा-या रत्नागिरीतील स्व. डॉ. धनंजय कीर उपकेंद्रामध्ये सुरु आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी प्रकल्प प्रमुख डॉ. पांडुरंग पाटील यांनी रत्नागिरी शहराच्या हवा प्रदूषण प्रकल्पाबद्दल व हवा प्रदूषणाच्या सद्य स्थितीबद्दल माहिती सांगितली  आहे.

रत्नागिरी शहराची हवा प्रदूषणाची पातळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चोवीस तासांच्या मानांकनाच्या मर्यादेमध्ये बसत असून, कोविडमधील लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी प्रमाणातील वर्दळ आणि त्याद्वारे वातावरणामध्ये होणारे प्रदूषण घटकांचे उत्सर्जन, मागील दोन महिन्यातील पर्जन्यवृष्टीमुळे शहराची हवा प्रदूषण पातळी मानांकनाच्या मर्यादेत आहे. शहरातील वातावरण निरोगी आहे, असा निष्कर्ष मुंबई विद्यापिठाच्या रत्नागिरी उपकेंद्रांतर्गत सुरु असलेल्या अभ्यासातून काढण्यात आला.

मार्च २०२३ साली याचा अहवाल राज्य शासनाच्या प्रदुषण मंडळाकडे सादर केला जाणार असून, त्यामध्ये वैज्ञानिक सहाय्यक अजय गौड, क्षेत्र सहाय्यक सुशांत कुंभार आणि कैलास जाधव हे सहाय्य करत आहेत. उद्घाटन सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित नुकताच पार पडला आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील,  मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड आणि उपकेंद्राचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर उपस्थित होते.

शहरातील हवा प्रदूषण मापनासाठी रत्नागिरी उपपरिसराची कार्यालयीन इमारत आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेची या इमारतीचा समावेश केलेला आहे. या प्रकल्पाद्वारे शहरातील एसओ २, एनओ २ व पीएम १०, पीएम २.५  या हवा प्रदूषण घटकांचे मोजमाप केले जाते. गेल्या पाच महिन्यांच्या नोंदीमध्ये रत्नागिरी शहर प्रदुषणमुक्त असल्याचे दिसून आले आहे. सीओटू आणि एनओटूचे प्रमाण ८० मायक्रोग्रॅम परमीटर क्युबच्या दरम्यान असणे आवश्यक असते. रत्नागिरीतील नोंदी मानांकनाच्या खाली आहेत. पीएम १०  चे मानांकन १००  मायक्रोग्रॅम पर मीटर क्युब आणि पीएम २.५  चे मानांकन ६० मायक्रोगॅम पर मीटर क्युब अपेक्षित आहे. पीएम २.५  धुलीकण हे श्वसन नलीकेमधून फुफ्फुसात प्रवेश केल्यास ते आरोग्यास अपायकारक ठरु शकतात.

RELATED ARTICLES

Most Popular