26.1 C
Ratnagiri
Thursday, July 18, 2024

जिल्ह्यात २० तारीखे पर्यंत रेड अलर्ट…

जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून...

‘सिव्हिल’मधील समस्यांचा वाचला पाढा – शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक

गोरगरिबांचा आधार असलेल्या जिल्हा रुग्णालयाची वरून रंगरंगोटी...

चिपळूणमध्ये विहिरीतील पाण्यात मगरीचे पिल्लू, वनविभागाने पकडले

शहरातील वाणीआळीतील एका विहिरीत पुराच्या पाण्याबरोबर मगरीचे...
HomeRatnagiriकोरोनामुक्त गावात शैक्षणिक वर्ग होऊ शकतात सुरु!

कोरोनामुक्त गावात शैक्षणिक वर्ग होऊ शकतात सुरु!

कोरोनामुळे गेले वर्षभर शाळा, कॉलेज, सर्वच खाजगी शैक्षणिक संस्था बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील इयत्ता १०वी आणि १२वीचे महत्वाचे वर्षे ज्यावरून भविष्यामध्ये पुढे काय बनायचे हे विद्यार्थ्यांना आकलन होते, एक इच्छित ध्येय डोळ्यासमोर ठेऊन विद्यार्थी त्या जोमाने तयारीला लागतात. सध्या कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब केला जात आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रभाव काही भागातील कमी होताना दिसत आहे. काही गावे हि कोरोनामुक्त सुद्धा झालेली आहेत. मागील वर्षी कोरोनाचा विस्फोट झाल्याने इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या. परीक्षाकेंद्रामध्ये एकत्रितरित्या परीक्षा घेणे शक्य नसल्याने, आणि बोर्डाची परीक्षा ऑनलाईन घेण्याएवढी तांत्रिक सुविधा सर्वत्र उपलब्ध नसल्याने तेही शक्य होणार नसल्याचे आणि  मुलांच्या जीवनाशी आम्ही खेळू शकत नाही, आणि अनेक पालकांचा सुद्धा पाल्यांना प्रत्यक्ष केंद्रावर पाठविण्यास नकारच होता असे शिक्षण मंत्री गायकवाड यांनी सांगितले.

त्यामुळे जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त झाली आहेत, भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता १०वी आणि १२ वीचे वर्ग सुरु करता येतील का याची शक्यता शिक्षण विभागाने पडताळून पहावी, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेले असलेल्या विद्यार्थ्यांचा इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च शालेय शिक्षण विभागामार्फत उचलण्यात येण्याबाबत विचार सुरु असण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक घेण्यात आली, या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मुख्य सचिव सीताराम कुंटे, यांसह शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular