26.2 C
Ratnagiri
Sunday, November 10, 2024

चिपळुणातील सामान्यांचा एसटी प्रवास खडतर

प्रवासी संख्या वाढल्याने एसटीला अच्छे दिन येऊ...

मिऱ्या गावामध्ये उबाठाला खिंडार शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश

रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील उबाठा, महाविकास आघाडीचे उमेदवार...

रामदासभाई कदम यांचे उद्धव ठाकरेंना उघड आव्हान…

कोकाकोला कंपनीचा अर्ज तुमच्याकडे मुख्यमंत्री झाल्यानंतर कधी...
HomeRatnagiriआरजीपीपीएल प्रकल्प बंद पडू देणार नाही -खास. सुनील तटकरे

आरजीपीपीएल प्रकल्प बंद पडू देणार नाही -खास. सुनील तटकरे

महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री असताना खास. सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, केंद्र सरकारने रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प कंपनीची स्थापना केली.

रत्नागिरीमध्ये कार्यान्वित असलेला गॅस आणि वीज प्रकल्प हा महत्त्वाचा प्रकल्प असून, कोकणाच्या विकासासाठी आणि स्थानिकांचा रोजगार टिकून राहण्यासाठी त्याचे काम पूर्ण क्षमतेने चालणे गरजेचे  आहे. हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही,  अशी ग्वाही खास. सुनील तटकरे यांनी दिली आहे.

ओएनजीसी कडून होणारा गॅस पुरवठा जा अपुऱ्या स्वरुपात होत असल्याने १९६४ मेगावॉटची क्षमता असलेल्या आरजीपीपीएलमध्ये सध्या अनियमितपणे केवळ २०० मेगावॉट वीज निर्मिती होत आहे. हा गॅस पुरवठा देखील अनेक वेळा होत नसल्याने, वीज निर्मितीचे कामकाज थांबण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरजीपीपीएल कंपनी बंद पडेल कि काय ! अशी चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.

महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री असताना खास. सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, केंद्र सरकारने रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प कंपनीची स्थापना केली. त्यामुळे नव्या कंपनीकडे मालमत्तेचे हस्तांतरण करण्यापासून ते इतर अनेक गोष्टींची सविस्तर माहिती तटकरे यांना आहे. राज्याची वीज निर्मिती क्षमता, वीजदरांमागील अर्थकारण, महाजनकोच्या प्रकल्पांची स्थिती या गोष्टीशी खास. तटकरे सर्वज्ञात आहेत.

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आरजीपीपीएलवरील अपुऱ्या गॅस पुरवठ्याचे संकट दूर व्हावे यासाठी खास. सुनील तटकरे यांची भेट घेतली होती. गुहागरच्या दौऱ्यावर आले असता पत्रकारांनी यासंदर्भात खासदारांना प्रश्न विचारला तेव्हा तटकरेनी सांगितले कि, आरजीपीपीएल प्रकल्पामुळे दापोली, गुहागर या दोन तालुक्यातील अनेकांना रोजगार प्राप्त झाला आहे. त्यामुळे हा प्रकल्प बंद पडणार नाही याची काळजी घेऊ, अशी ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे.

पुढील महिन्यात आरजीपीपीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन, त्यांच्या नेमक्या अडचणी काय आहेत! परदेशातून येणाऱ्या गॅसवर वीज उत्पादनाचा दर किती असेल? किंवा कोणत्या खासगी क्षेत्राला या दरात वीज परवडू शकते, इत्यादी बाबी जाणून घेऊन या विषयांवर केंद्रीय मंत्री हरदिप पुरी यांची भेट घेऊन निश्चितच यातून मार्ग काढू.

RELATED ARTICLES

Most Popular