21.1 C
Ratnagiri
Tuesday, December 24, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriजिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईची समस्या, टँकर लागले धावू

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईची समस्या, टँकर लागले धावू

दरवर्षी जिल्ह्याला १०० पेक्षा जास्त गावांमध्ये टँकरने पाणी पुरवावे लागते.

फेब्रुवारी महिन्यापासूनच यंदा जिल्ह्यात पाणी टंचाईला सुरूवात झाली आहे. जिल्ह्याचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा अद्याप तयार झालेला नाही. संगमेश्वर तालुका वगळता अन्य एकाही तालुक्यांचा आराखडा जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडे सादर झालेला नाही. चिपळूणचा आराखडा अंतिम टप्प्यात आला असून आमदारांचीही सही झालेली आहे. अन्य तालुक्यांकडून आराखडेच आलेले नाहीत.

दरवर्षी जिल्ह्याला १०० पेक्षा जास्त गावांमध्ये टँकरने पाणी पुरवावे लागते. लांजा तालुक्यात एका वाडीमध्ये टँकरने पाणीपुरवठा चालू झाला आहे; परंतु अजुनही जिल्ह्याचा टंचाई आराखडा तयार करण्यात आलेला नाही. दरवर्षी जानेवारी महिन्यात आराखडा जिल्हा प्रशासनाला सादर केला जातो.

तालुक्यातील ऐनवली-बंगालवाडीत शासकीय टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अतिवृष्टी काळात येथील पाणी पुरवठा योजना नादुरुस्त झाल्याने येथील नागरिकांना शासकीय टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.  तालुक्यातील ऐनवली – बंगालवाडी येथे अतिवृष्टीमध्ये पाणीपुरवठा करणार्‍या नळपाणीपुरवठा योजनेची विहीरच वाहून गेली होती. त्यामुळे टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी काही दिवसांपूर्वी या गावातील लोकांनी केली.

त्यामुळे इतक्या लवकर जाणवू लागलेली पाण्याची टंचाई लक्षात घेऊन दि. १४ रोजी या गावात पाण्याचा  पहिला टँकर पाठवण्यात आला आहे. तालुक्यातील केळणे गावाने देखील टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. अतिवृष्टीमुळे अनेक पाणी योजनांचे नुकसान झाले असून त्यामुळे या वर्षी तब्बल दोन महिने अगोदरच खेडमध्ये शासकीय टँकर पाणीपुरवठा करण्यासाठी धावला आहे. सध्या ऋतूंचे गौडबंगाल झाल्याने, कधीही पाऊस, कधी थंडी आणि कधी कडक उन्ह पडत असल्याने वातावरणाची सुद्धा संभ्रमित अवस्था आहे. अजून उन्हाळयाचे तीन महिने बाकी असल्याने जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवण्याचे संकेत दिसत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular