23.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriलसीकरणाच्या आवाहनाला जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद – जिल्हाधिकारी रत्नागिरी

लसीकरणाच्या आवाहनाला जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद – जिल्हाधिकारी रत्नागिरी

कोरोनाची दुसरी लाट संपुष्टात येत असताना अचानक नव्या ओमिक्रॉन विषाणूने डोके वर काढल्याने, जिल्हा प्रशासनाने पुन्हा मागील दोन वर्षासारखी भयावह परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आधीपासूनच काळजी घेण्याचे सांगितले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा सर्व ख्रिस्ती बांधवाना ख्रिसमसच्या शुभेच्छा देऊन सण साध्या पद्धतीने आणि जबाबदारीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. नववर्षाच्या आगमनाचे कार्यक्रम सुद्धा साध्या पद्धतीने साजरे करावेत. त्याचप्रमाणे,  जिल्हा स्तरावर सुद्धा रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी गर्दी होणार नाही, विषाणूचा प्रसार होण्यास कोणी कारणीभूत ठरू नये, तो रोखण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील रहावे,  असे जिल्हावासीयांना आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे, मच्छीमारी नौकांवर आणि आंबा बागेत कामासाठी बाहेरुन येणाऱ्‍या नेपाळी गुरख्यांचे लसीकरणासाठी प्राधान्याने कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे, असे सांगितले.

त्यांनी दिलेल्या माहिती नुसार जिल्ह्यात आतापर्यंत १० लाख १ हजार ५८८ नागरिकांनी पहिला तर ६ लाख १६ हजार ४२६ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. परंतु त्यामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे कि, अद्याप ८० हजार नागरिकांनी लसीचा पहिला डोस देखील घेतला नसल्याचे जिल्हाधिकाऱ्‍यांनी सांगितले. हे नागरिक एकतर ग्रामीण भागातील राहणारे अथवा जिल्ह्याबाहेरही असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यात परदेशातून अनेक नागरिक आले असल्याने लसीकरण करण्यावर जास्त भर देण्यात येत आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती उदय बने यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीत ओमायक्रॉनचा आढावा घेण्यात आला.कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन केले जात असल्याने जिल्ह्यात बुधवार अखेर ओमिक्रॉनचा एकही रूग्ण आढळलेला नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने यांच्या लसीकरणाच्या आवाहनाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular