29.5 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriजिल्ह्यात सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी विशेष प्रयत्न

जिल्ह्यात सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी विशेष प्रयत्न

स्वच्छता, आरोग्य चांगले राखण्यासाठी अनुदानावर योजनेचा लाभ सर्व कुटुंबांना देण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरामध्ये सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी विशेष प्रयत्न जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे सुरु करण्यात आले आहेत. जिल्ह्यात ३ लाख ३२ हजार १३९ घरे असून प्रत्येक कुटुंबात जाऊन योजनची जनजागृती केली जाणार आहे. स्वच्छता, आरोग्य चांगले राखण्यासाठी अनुदानावर योजनेचा लाभ सर्व कुटुंबांना देण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

ग्रामीण भागात विखुरलेल्या वाडी, वस्त्यांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणे शक्य होत नाही. शहरांकडील ओढा वाढत असला तरीही निवासाची व्यवस्था नसल्यामुळे लोकं शहरांजवळील गावात राहू लागले आहेत. शासनाने गावातच राहून रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने अनेकजणं ग्रामीण भागातच राहून रोजगार संधी उपलब्ध करण्यावर भर देण्याच्या विचारात आहेत. प्रत्येक वाडीचे, गावातील लोकांच्या आरोग्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.

कचरा, सांडपाण्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. हे टाळण्यासाठी गावस्तरावर त्याचे योग्य प्रकारे नियोजन करण्यावर विशेष भर दिला जात आहे. कोणत्याही कामामध्ये सामुहीक सहभाग असेल तरच एखादे काम पूर्णत्वास जाते. त्यामुळे गावातील प्रत्येक कुटुंबाचा हातभार लागला तर योजना लवकर अंमलात येण्यास मदत होते. हे लक्षात घेऊन स्वच्छता मिशन कक्षाकडून प्रत्येक कुटुंबापर्यंत योजनेची माहिती पोचवण्याचा नियोजन केले आहे.

नवीन रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरावर बैठका घेणे सुरू आहेत. जिल्ह्यात ३ लाख ३२ हजार कुटुंबे असून योजनांचा लाभ त्या कुटुंबांना दिला जाणार आहे. सांडपाणी व्यवस्थापनामध्ये वैयक्तिक शोषखड्डे उभारण्यासाठी ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येनुसार प्रतिव्यक्ती २८० रुपयांप्रमाणे निधी दिला जातो. घनकचरा व्यवस्थापनामध्ये ओला, सुखा कचरा वर्गीकरण करुन तो संकलीत करणे आणि त्यांची विल्हेवाट लावणे, विघटनशील कचर्‍यांचे व्यवस्थापन करणे, गांडूळ खत निर्मितीला चालना देण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular