28.2 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...

कामगारांना वेतन २५ हजार मिळतात फक्त ९ ते १० हजार – महानिर्मिती अधिकारी

पोफळी येथील महानिर्मिती विभागात १८० कामगार ठेकेदार...
HomeRatnagiriरत्नागिरीतील घनकचऱ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागण्यास सुरुवात

रत्नागिरीतील घनकचऱ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागण्यास सुरुवात

घनकचऱ्यावर बायो मायनिंग मशिनद्वारे प्रक्रिया करून त्याचे खत तयार करण्यात येत आहे.

रत्नागिरी शहरातील घनकचरा साळवी स्टॉप येथे डम्प करण्यात येतो. या कचऱ्याच्या पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे दूरपर्यंत वायू प्रदूषण होत असे.अनेकदा या कचऱ्याची विल्हेवाट लावताना येथे लावण्यात येणाऱ्या आगीने साळवी स्टॉप,  कोकण नगर आदी भागामध्ये धुराचे लोळ उठत असत. या भागातील नागरिकांना या दुषित धुराचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावरून जाताना सुद्धा धुरामुळे पुढील वाहन दिसण्यास सुद्धा काही वेळा अडथळा निर्माण होतो. संपूर्ण परिसरामध्ये धूर निर्माण झाल्याने, वाहतुकीस सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. आणि अशुद्ध होणार्या वातावरणामुळे अनेकांना श्वसनाचे त्रास सुद्धा जाणवू लागले आहेत.

अनेक महिने खितपत पडलेला घनकचरा टाकण्याच्या जागेपासून ते नियोजनापर्यंतचा प्रश्न अखेर मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरी परिसरातील सुमारे १ लाख ६० हजार क्युबिक मिटर साचलेल्या घनकचऱ्यावर बायो मायनिंग मशिनद्वारे प्रक्रिया करून त्याचे खत तयार करण्यात येत आहे. या खताला मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याने कचऱ्यापासून खात निर्मिती हि संकल्पना देखील अतिशय उत्कृष समजली जात आहे.

पालिकेचे माजी आरोग्य सभापती निमेश नायर यांच्या प्रयत्नाने हा तिढा सुटला आहे. पहिल्या टप्प्यात २८ लाख रुपये खर्च करून ४ हजार क्युबिक मिटर कचरा कमी करण्यात आला. तर उर्वरित कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुमार प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पालिका या खताची विक्री करत असून त्याला चांगली मागणीही आहे. टाकाऊ पासून टिकावू बनविण्यासाठी निमेश नायर यांनी अथक प्रयत्न केले आहेत. आणि त्यामुळे अखेर रत्नागिरीमध्ये घनकचरा प्रकरण अखेर मार्गी लागले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular