29.5 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriकोकणकन्येची केदारकंठ शिखरावर यशस्वी चढाई

कोकणकन्येची केदारकंठ शिखरावर यशस्वी चढाई

कोकणामध्ये एवढ सौदर्य भरलेल आहे कि, सौदर्याच्या शोधात बाहेर फिरण्याची गरजच भासत नाही. तरी पण एक छंद म्हणून अनेकांना डोंगर, दऱ्या, पर्वत, ट्रेकिंगला जाण्याची फार आवड असते. प्रत्येक विकेंडला अनेक जण विविध प्लान ठरवून मित्र मंडळी, कुटुंब किंवा काही वेळा एकटेच भटकंती साठी बाहेर पडतात.

रत्नागिरीतील एका छोट्याश्या सागवे गावातील कविता बोटले हिने हिमालयाच्या कुशीतले नंदनवन असलेला बारा हजार पाचशे फूट उंचीचा “केदारकंठ” हा ट्रेक यशस्वीरित्या पार केला आहे. प्रत्येक गिर्यारोहकांचे नवीन उत्तुंग भरारी घेण्याचे ध्येय असते. त्याच प्रमाणे रत्नागिरीतील कविता हिने उत्तराखंड मधील बर्फाने आच्छादलेला केदारकंठ ट्रेक यशस्वीरीत्या पार केला आहे.

केदारकंठची मोहीम यशस्वीपणे पार पाडणे, ही प्रत्येक गिर्यारोहकासाठी एक मोठी जोखीम आहे. पण मनातली जिद्द शिखर सर करण्याची निसर्गाच प्रत्येक आव्हान पेलण्याच धाडस देते. हीच जिद्द आणि धाडस मनात घेऊन कविताने हे उत्तुंग केदारकंठ वर यशस्वी चढाई केली.

केदारकंठवर चढण्यासाठी संपूर्ण रस्ता हा उभी चढण असून, जोरदार बर्फ वृष्टी होत असल्याने, त्यामध्ये उंचीमुळे ऑक्सिजनचा तुटवडा, अपुरा पुरवठा त्यामुळे केदारकंठ सर करणे म्हणजे एक प्रकारची जीवाची बाजी लावण्यासारखे आहे. कॉलेज मध्ये एनसीसी मध्ये असल्याने आणि लहानपणापासूनच धाडसी वृत्ती अंगी असल्याने, अनेक ट्रेक किंवा इतर अभियानामध्ये हिरीरीने सहभाग घेत असे. हिमगिरी ट्रेक संस्थेच्या आधारे तिने हे केदारकंठ सर केले.

खडतर रस्ते, बर्फाळ हवामानातून चालत चढाई करत कविता आणि तिच्या सहकार्यांनी आंतरराष्ट्रीय गिर्यारोहण दिनाचे औचित्य साधून केदारकंठ शिखरावर भारताचा ध्वज फडकवला. तिचे पुढील लक्ष आहे हिमालय.

RELATED ARTICLES

Most Popular