25.9 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriतालुक्यात निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाची बाजी

तालुक्यात निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाची बाजी

आमदार राजन साळवी यांनी फणसोप या त्यांच्या मूळगावी बाजी मारत सामंतांना धक्का दिला आहे.

रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायत व फणसोप,शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे सरपंच विराजमान झाले आहेत. संपूर्ण तालुक्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या शिरगाव ग्रामपंचायतीकडे होणाऱ्या मतदान आणि निवडणुकीच्या निकालावर सर्व पक्षांनी लक्ष केंद्रीत केले होते. तिरंगी लढत असल्याने निवडणूक अधिकच रंगतदार बनली.

पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाकडून आमदार राजन साळवी यांनी कॉर्नर सभा घेऊन निवडणुकीत रंगत आणली होती. पालकमंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आमदार राजन साळवी यांनी फणसोप या त्यांच्या मूळगावी बाजी मारत सामंतांना धक्का दिला आहे. लांजा इथेही उद्धव ठाकरे गटाने वर्चस्व प्रस्थापित करून बाजी मारली आहे.

रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली. सरपंच पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ममता जोशी यांना १ हजार १६० तर शिंदे गटाच्या बारगुडे यांना ८९२ मते पडली. उद्धव ठाकरे यांच्या गटातील जोशी या २६८ मतांनी विजयी झाल्या तर रत्नागिरीतील फणसोप ग्रामपंचायतीवर देखील उद्धव ठाकरे यांच्या सेनेने बाजी मारली. सरपंच पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या राधिका साळवी विजयी झाल्या. त्यांना १ हजार ४०० मत मिळाली तर शिंदे गटाच्या शेलार यांना १ हजार ३६ मत मिळाली. राधिका साळवी या ३६४ मतांनी विजयी झाल्या. ग्रामपंचायतीच्या ११ पैकी १० जागा उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे राहिल्या तर केवळ १ जागा शिंदे गटाकडे राहिली.

तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायत निवडणूक निकाल शेवटच्या फेरीपर्यंत रंगतदार झाला. सरपंचपदासाठी जोरदार टक्कर झाली. अखेर फरीदा काझी यांनी सरपंच पदावर विजय मिळविला.  सरपंच पदावर महा विकास आघाडीच्या फरीदा रज्जाक काझी विजयी झाल्याने या महत्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये उदय सामंत यांना चांगलाच फटका बसला असला आहे. १७ पैकी १५ जागा जिंकत शिंदे गटाने आपले वर्चस्व राखले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular