19.8 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriरत्नागिरीतील बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉलिंग सेंटर प्रकरण

रत्नागिरीतील बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉलिंग सेंटर प्रकरण

रत्नागिरीतील बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉलिंग सेंटरची चर्चा सर्वत्र सुरु आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय कॉलिंग सेंटरचा विषय अतिशय गंभीर आहे. रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथील येथील श्री मोबाईल अॅन्ड टेककॉम या दुकानात सीप ट्रॅकिंग सिस्टम बसवून इंटरनॅशनल कॉलिंग सेंटर चालवणाऱ्या दोन संशयितांच्या पोलिस कोठडीमध्ये न्यायालयाने २१ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.

अलंकार अरविंद विचारे आणि फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी अशी पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत रत्नागिरी पोलिसांना मुंबई एटीएसकडून माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी कारवाई करत या दोघांनाही अटक केली होती. त्यांना १४ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १७ ऑगस्टपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. मंगळवारी या कोठडीची मुदत संपल्यामुळे संशयितांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालाने त्यांची पुन्हा २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. दरम्यान, संशयितांच्या अन्य सहकाऱ्यांचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली.

तपासात ताब्यात घेण्यात आलेल्या राउटरमधून बाहेरील देशात १८ हजार कॉल झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य अजूनच वाढले आहे. पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. सौदी, कुवेत, ओमान, मस्कत, कतार, आदी आखाती देशातुन बेकायदेशीर कॉलिंग सेंटरमधून सिप ट्रंकिंग सिस्टीम व संगणकाचा वापर करुन रत्नागिरीमध्ये कॉल आल्याचे निष्पन्न झाले आहे. पाकिस्तानमध्ये काही कॉलिंग करण्यात आले आहे का याबाबत देखील सखोल माहिती घेण सुरु आहे.

रत्नागिरी येथे कारवाई केलेल्या बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉलिंग सेंटरची गंभीर दखल देशाच्या संरक्षण विभागाने देखील घेतली असून, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे प्रकरण अतिशय संवेदनशील असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सखोल आणि बारकाईने तपासकार्य सुरू ठेवण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular