25 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriपावस अपहरण प्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल

पावस अपहरण प्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी पोलीस यांच्या कार्यतत्परतेमुळे पावस एस. टी. स्टँड येथून अपहरण झालेल्या तरुणाच्या प्रकरणी पूर्णगड पोलिसांनी ६ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

गुन्ह्यांचे प्रमाण आता ग्रामीण भागाकडे जास्त वळू आणि वाढू लागले आहे. मोठ्या शहरांमध्ये घडत असलेले गुन्हे आत्ता हळूहळू लहान गावांमध्ये सुद्धा सर्हास घडताना दिसू लागले आहेत. रत्नागिरी पावस येथील एस.टी. स्टँड येथे एका २१ वर्षीय तरुणाला मारहाण करून त्याला सुमो गाडीत टाकून पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शुक्रवार १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. विशाल रजपूत असे मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, याबाबत त्याचा भाऊ मनोज मंगेश शिर्के यांनी भावाच्या अपहरण प्रकरणी ४ ते ५ अज्ञातांविरोधात पूर्णगड पोलिस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली  आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सुरेश गावीत करत आहेत.

रत्नागिरी पोलीस यांच्या कार्यतत्परतेमुळे पावस एस. टी. स्टँड येथून अपहरण झालेल्या तरुणाच्या प्रकरणी पूर्णगड पोलिसांनी ६ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशाल विलास रजपूत वय २१ या तरुणाला पावस एस. टी. स्टँड येथे मारहाण करीत जबरदस्तीने टाटा सुमो गाडीत बसवून पळवून नेल्याची तक्रार मनोज मंगेश शिर्के यांनी पूर्णगड पोलिसात दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सदर प्रकरणी संतोष गोविंद ठीक, राजू रूपसिंग राठोड,  शकील सोहेल बोडेकर, विजय बाबल्या तावरे, अब्दुल गनी शेख आणि अन्य एका आरोपी यांना ताब्यात घेऊन,  पूर्णगड पोलीसानी  भा.दं.वि.क. ३६३,३२३,५०४,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गावित यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular