26.4 C
Ratnagiri
Wednesday, August 6, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeRatnagiriगणेशोत्सव काळात वीज पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी काम युद्ध पातळीवर - श्री. भटकर

गणेशोत्सव काळात वीज पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी काम युद्ध पातळीवर – श्री. भटकर

रत्नागिरीतील कोकण परिमंडळ मुख्य अभियंता पदाचा कार्यभार श्री. देवेंद्र सायनेकर यांचेकडून श्री. विजय भटकर यांनी आज स्वीकारला. या वेळी अधीक्षक अभियंता श्री. देवेंद्र सायनेकर, सहाय्यक महाव्यवस्थापक श्री. वैभव थोरात, कार्यकारी अभियंता श्री. रामलिंग बेले, औद्योगिक संबंध अधिकारी श्री. आप्पासाहेब पाटील आदी अधिकाऱ्यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले.

श्री.सायनेकर यांनी नूतन मुख्य अभियंता श्री. भटकर यांच्या पुर्वानुभावाबद्दल सांगताना म्हटले कि, राज्यातील विविध ठिकाणी वीजक्षेत्रात यांनी काम केले असून त्यांच्या दांडग्या अनुभवाचा फायदा नक्कीच कोकण परिमंडळ अंतर्गत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहक आणि कर्मचाऱ्याना होईल.

यावेळी श्री. विजय भटकर म्हणाले कि, मागील काळात नैसर्गिक आपत्तीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कोकणातील वीज कर्मचाऱ्यानी अविरत परिश्रम घेतली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज अधिकाऱ्यांशी ऑनलाईन दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत श्री. भटकर यांनी मार्गदर्शन केले तसेच मुख्य अभियंता पदाचे काम श्री देवेंद्र सायनेकर यांनी उत्तम प्रकारे पार पाडल्याचे विशेष सांगितले.

सद्यस्थितीत कोकण परिमंडळ अंतर्गत वीज बिल थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्याचे त्यांनी सांगितले आणि ऐन सणाच्या काळात वीज पुरवठा खंडित करण्याची नामुष्की ओढवू नये यासाठी वीज ग्राहकांनी आपली वीज थकबाकी तातडीने भरावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच कोकणातील प्रमुख सण गणेशोत्सव काळात वीज पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी काम युद्ध पातळीवर सुरु असल्याची माहिती श्री. भटकर यांनी दिली. त्याचप्रमाणे, काही अधिकारी मर्जीतल्या थकबाकीदार वीज ग्राहकांवर कारवाई करण्यासाठी दिरंगाई करत असल्याचे निष्पन्न झाल्याने अशा अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे नूतन मुख्य अभियंता श्री. विजय भटकर यांनी स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular