25.3 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriरस्त्यांच्या दुरावस्थेबाबत भाजप ओबीसी महिला सेलतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना ईमेलद्वारे निवेदन

रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत भाजप ओबीसी महिला सेलतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना ईमेलद्वारे निवेदन

गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चार-पाच दिवसांपूर्वी शहरातील रस्त्यांवरील भरलेले खड्डे पुन्हा उखडले आहेत.

खड्डेमय झालेली रत्नागिरी कधी सुधारणार ! रत्नागिरीतील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेबाबत भाजप ओबीसी महिला सेलतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना ईमेलद्वारे निवेदन देण्यात आले आहे. रत्नागिरी शहर, नाचणे रोड मुख्य रस्ता आणि अंतर्गत रस्ते यावरील खड्ड्यांची अवस्था खूपच गंभीर झाली असून, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य दिसत आहे. मागील अनेक महिने याबाबत आम्ही पाठपुरावा करीत आहोत,  गणपतीपूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावेत अशी मागणी आम्ही याआधीहि रत्नागिरी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली होती, मात्र अद्यापपर्यंत रस्त्यांच्या बाबतीत उपाययोजना करण्यात निराशाच दिसत आहे.

उदया पासून गणेशोत्सव सुरू होत आहे. या काळात गणपतीच्या मूर्तींची ने-आण करण्यासाठी तसेच अनेक चाकरमानी गावी येतात, त्यासाठी रस्ते उत्तम असणे आवश्यक असताना खड्डयामध्ये रस्ते गायब झाले आहेत. आणि याचा त्रास गणेशभक्तांना सहन करावा लागत आहे. गणेशमूर्ती घरी आणताना कसरत करावी लागत आहे. नाचणे, मंगळवार बाजार शेजारी, पॉलिटेक्निक रोड, विश्वनगर, नूतन नगर, पॉवर हाऊस, राजेंद्र नगर, मारुती मंदिर भाजी मार्केट आदी भागातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. पादचाऱ्याना चालणे देखील कठीण बनले आहे. सत्ताधारी पक्ष आणि संबंधित नगरसेवक याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चार-पाच दिवसांपूर्वी शहरातील रस्त्यांवरील भरलेले खड्डे पुन्हा उखडले आहेत. त्यामुळे रस्त्यांची अक्षरशा चलन झाली आहे. वाहनचालकांनाही खड्ड्यांतून वाहने चालविताना तारेवरची कसरत करत खड्डे चुकवत अथवा रस्ता शोधावा लागत आहे. त्यामुळे आपण यामध्ये विशेष लक्ष घालून रत्नागिरीकरांना त्रासमुक्त करावे,अशी विनंती भाजप ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्ष प्राजक्ता प्रवीण रुमडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या ईमेलमध्ये केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular