26.1 C
Ratnagiri
Friday, April 4, 2025

भरणे नाक्यावरील ‘ती’ अतिक्रमणे हटवली, दंडात्मक कारवाई

भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी...

‘वाशिष्ठी’तील गाळ उपसा मोहीम थंडावली

चिपळूण शहर व परिसरात जुलै २०२१ मध्ये...

‘अदृश्य कामगार’ येणार उजेडात मंत्री सामंतांकडून आढावा

रत्नागिरी पालिकेतील मक्तेदारीवरील मलिदा खाण्याला आता लवकरच...
HomeRatnagiriवाहनांच्या ऑनलाईन बोगस नोंदणी प्रकरणात, लाखोंचा महसूल बुडाला

वाहनांच्या ऑनलाईन बोगस नोंदणी प्रकरणात, लाखोंचा महसूल बुडाला

कार्यालयातील कर्मचाऱ्याशी संधान असल्याशिवाय एवढा मोठा घोळ होणार नाही.

रत्नागिरी आरटीओ कार्यालयाने वाहनांच्या बोगस नोंदणी करण्यात आलेल्या प्रकरणातील २२ जणांना नव्याने दिलेल्या नोटिसांमुळे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या वाहनांमध्ये आमदार, त्यांच्या नातेवाइकांच्या गाड्याचा समावेश आहे. काही जिल्ह्यांत आयुक्तांच्या विशेष आदेशानंतर टॅक्स भरून ही वाहने नियमित करण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील टॅक्स भरलेल्या १०९ वाहनधारकांना आयुक्तांनी ती नियमित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील या प्रकरणाने बोगस वाहननोंदणीचे प्रकरण चांगलेच चर्चेला आहे. जुने प्रकरण असल्याने सध्या पदावर असलेल्या विद्यमान अधिकाऱ्यांचा त्याच्याशी काही संबंध नाही; मात्र एक बाजू पुढे आल्याने केवळ एजंटांना दोषी धरले जात असले तरी संपूर्ण ऑनलाइन सिस्टीमचे नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या हाती आहे. त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्याशी संधान असल्याशिवाय एवढा मोठा घोळ होणार नाही. यामध्ये फक्त एजंटच बदनाम होत आहेत, असा सूर बहुतांशी एजंटचा आज होता.

परंतु, एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस नोंदणी झालीच कशी याचा शोध घेतला असता, ऑनलाइन नोंदणीत चासिस नंबरमध्ये जादा डॉट टाकून वाहनांच्या बोगस नोंदणी करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील १३६ वाहनांचा समावेश होता. त्यातील १०९ जणांनी ठराविक टॅक्स भरला असून, २२ जणांना टॅक्स भरण्याची अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु, येत्या सात दिवसात त्यांनी टॅक्स भरला नाही तर वाहननोंदणी रद्द होण्याची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर आहे. बोगस नोंदणीमुळे १७ लाख ४९ हजाराचा टॅक्स आणि पसंती क्रमांकाचे ८ लाख ७९ हजार शासनाचा महसूल या झालेल्या घोळामुळे बुडाला आहे.

बोगस नोंदणी झालेल्या वाहनांमध्ये अनेक कंपन्यांच्या नवीन चारचाकी वाहनांचा समावेश आहे. सिंधुदुर्गमधील आमदार आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आमदारांच्या नातेवाइकांच्याही गाड्यांचा यामध्ये समावेश आहे. परिवहन आयुक्तांकडे मागणी करून त्यापैकी काही वाहनांची टॅक्स भरून घेऊन नियमित नोंदणी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular