29.1 C
Ratnagiri
Tuesday, August 5, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeRatnagiriविलीनीकरणाची जबाबदारी घे, एसटी कर्मचाऱ्यांना सुखशांती आणि या गरीब जनतेची लालपरी वाचव...

विलीनीकरणाची जबाबदारी घे, एसटी कर्मचाऱ्यांना सुखशांती आणि या गरीब जनतेची लालपरी वाचव रे महाराजा – गणरायाला साकडे

रत्नागिरी विभागातील कर्मचाऱ्यांनीच माघी गणेशोत्सवाचे औचित्य साधत गणरायालाच गाऱ्हाणे घालून आपल्या अडचणी त्याच्या चरणी मांडल्या आहेत.

सर्वत्र माघी गणपतीची स्थापना झालेली आहे. रत्नागिरीतील एसटी कर्मचाऱ्यांनी महिनोन्महिने सुरु असलेल्या एसटी विलीनीकरणाच्या संपाबाबत अखेर गणरायालाच साकडे घातले आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असलेल्या रत्नागिरी विभागातील कर्मचाऱ्यांनीच माघी गणेशोत्सवाचे औचित्य साधत गणरायालाच गाऱ्हाणे घालून आपल्या अडचणी त्याच्या चरणी मांडल्या आहेत.

कोकण आणि गणेशोत्सव हे एक वेगळेच समीकरणच आहे. गणपती आणि शिमगा हे कोकणामध्ये अतिशय उत्साहात साजरे केले जातात. गणरायाला घातलेले गाऱ्हाणे पावन होते. अशी सर्वच धारणा गणेशभक्तांची आहे. गणरायावरील श्रद्धेपोटी साऱ्या कर्मचाऱ्यांनी गणरायाच्या मंदिरात एकत्र येत विलीनीकरण करण्यासाठी साकडे घातले आहे.

सध्या मागील तीन महिन्यापासून एसटी कर्मचारी दुखवटा पाळत आहेत. त्यांच्या बाजूने उभा राहा.या शासनास आणि प्रशासनास विलीनीकरणाची सद्बुद्धी दे रे महाराजा. या सर्वांची बडतर्फी, निलंबन, सेवासमाप्ती यापासून संरक्षण कर. विलीनीकरणाची जबाबदारी घे, एसटी कर्मचाऱ्यांना सुखशांती आणि या गरीब जनतेची लालपरी वाचव रे महाराजा’, असे गाऱ्हाणे घालण्यात आले.

इथे एसटी कर्मचारी विलिनीकरणासाठी तीन महिने लढा देत गणपतील गाऱ्हाणे घालत आहेत, तर एसटी इतके महिने बंद असल्याने सर्वसामान्यांची गैरसोय होत असून त्यांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. शासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेवून जनतेचे हाल दूर करून दिलासा द्यावा, म्हणून रत्नागिरी तालुका ओबीसी संघर्ष समितीने पुढाकार घेतला असून, या सगळ्यावर योग्य आणि लवकरात लवकर तोडगा निघण्यासाठी गुरूवार दि. १० रोजी सकाळी दहा वाजता माळनाका एसटी आगार येथून विविध विद्यार्थी संघटना, शिक्षक संघटना, कर्मचारी, कामगार,  एसटी कर्मचारी, व्यापारी संघटना, व सर्व जातीच्या संघटना एकत्र येवून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देणार आहेत, अशी माहिती ओबीसी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार मोहिते यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular