26.6 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeRatnagiriअतिरिक्त वापर झाल्याने, व्हॉट्सअॅप चॅटबॉट प्रणाली पहिल्याच दिवशी हॅंग

अतिरिक्त वापर झाल्याने, व्हॉट्सअॅप चॅटबॉट प्रणाली पहिल्याच दिवशी हॅंग

जास्तीत जास्त १८ हजार लोक त्याचा वापर करतील, अशी अपेक्षा होती; मात्र २२ हजार लोकांनी या प्रणालीचा वापर केल्याने ती हॅंग झाली

रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने आपत्ती आणि त्याच्या व्यवस्थापनासंबंधी माहिती व्हॉट्सअॅप चॅटबॉट प्रणालीद्वारे कळणाऱ्या यंत्रणेचे उद्घाटन प्रधान सचिव विनिता वेद सिंघल यांच्या हस्ते पार पडले. अनेक वेळा नैसर्गिक आपत्तीमुळे दूरध्वनी क्रमांक न लागणे अथवा सतत व्यस्त असणे त्यामुळे माहिती प्राप्त होत नाही, अशा परिस्थितीत हा चॅटबॉट विविध प्रकारची माहिती मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मेसेजचे पर्याय पाठवल्यास R१ ते R९ पर्यंत विविध माहितीची उपलब्धता असणार आहे. या स्वरूपाचा राज्यात हा पहिलाच उपक्रम राबविला जात आहे.

या प्रणालीचा अनुभव घेण्यासाठी अतिरिक्त वापर झाल्याने, जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापना संदर्भातील सर्व बाबींची माहिती देणाऱ्या व्हॉट्सअॅप चॅटबॉट प्रणाली पहिल्याच दिवशी हॅंग झाली. जास्तीत जास्त १८ हजार लोक त्याचा वापर करतील, अशी अपेक्षा होती; मात्र २२ हजार लोकांनी या प्रणालीचा वापर केल्याने ती हॅंग झाली; परंतु, तरीसुद्धा जिल्हा नियंत्रण कक्ष आणि अन्य अधिकाऱ्यांनी पहाटे ४ वाजेपर्यंत त्याच्यावर काम करून या प्रणालीची क्षमता वाढवण्यात आली असून त्यामध्ये काही बदलही करण्यात आले आहेत.

या प्रणालीच्या मदतीने प्रत्येक नागरिकास केवळ पर्जन्यमान नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्याचा नकाशा, जिल्ह्याबाबत जारी विशेष सूचना, नदीची पाणी पातळी, वेधशाळेतर्फे जारी सूचना, आपत्कालीन स्थितीत संपर्क करावयाचे क्रमांक,  रस्ते व वाहतूक, भरतीच्या वेळा तसेच वेळोवळी जारी करण्यात येणारे महत्वाचे संदेश तात्काळ प्राप्त होण्यासाठी ही प्रणाली सुरू केली गेली आहे. त्यासाठी ७३८७४९२१५६ हा मोबाईल क्रमांक देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular