27.9 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriरत्नागिरीकरांचे हाल कायम, जॅकवेलमधील मुख्य पंपाची पाईप फुटली

रत्नागिरीकरांचे हाल कायम, जॅकवेलमधील मुख्य पंपाची पाईप फुटली

शीळ येथील वेल्डिंग केलेला भाग तुटल्याने पुन्हा पाणीपुरवठा खंडित करावा लागला.

नकटीच्या लग्नात शंभर विघ्न, या म्हणीप्रमाणे शीळ जॅकवेलमधील पाणीपुरवठ्याची गत झाली आहे. सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी पालिका युद्धपातळीवर काम असताना जॅकवेलमधील दुसऱ्या मुख्य पंपाची वेल्ड केलेली पाईप सोमवारी सायंकाळी फुटली. त्यामुळे मंगळवारी (ता. ३) होणाऱ्या नियमित पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार असून, तो एक दिवस लांबण्याची शक्यता आहे. सायंकाळी उशिरा युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. शीळ जॅकवेलमधील सहा पंप सोमवारी सुरू झाल्यामुळे मंगळवारपासून (ता. ३) शहरात नियमित पाणीपुरवठा होणार होता. फ्लोटिंगचे दोनच पंप सुरू होते. आज आणखी दोन सुरू झाले, तर जॅकवेलमधील २५० अश्वशक्तीच्या २ पंपांपैकी एका पंपाद्वारे साळवी स्टॉप जलशुद्धीकरण केंद्रात पाणी उचलले जात होते.

आज दुपारी दुसराही पूँप सुरू झाला. त्यामुळे पूर्ण दाबाने जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा सुरू झाला आहे. शीळ जॅकवेल कोसळल्यामुळे शहरावर मोठे पाणी संकट आहे. पालिका, अन्वी कंपनी आणि मुंबईहुन फ्लोटिंग पंप जोडण्यासाठी आलेल्या कंपनीतर्फे शीळमध्ये काम सुरू होते. काल रात्री जोडण्यात आलेल्या पंपांची चाचणी झाली. फ्लोटिंग ४ पंपाऐवजी एक पंप सुरू होता. आज सायंकाळी चारही पंप सुरू झाले. त्यामुळे शीळच्या मुख्य जॅकवेलमध्ये पाण्याची टाकी क्षमतेने भरली. मात्र, जॅकवेलधील २५० अश्वशक्तीच्या २ पंपाऐवजी एकच पंपाची काल चाचणी झाली. यामध्ये काही तास पंप चालला. मात्र, काही वेळात शीळ येथील वेल्डिंग केलेला भाग तुटल्याने पुन्हा पाणीपुरवठा खंडित करावा लागला.

याची तत्काळ दुरुस्ती करण्यात आली. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर आज दुपारी दुसरा पंपही सुरू करण्यात आला. त्यामुळे साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्रात दाबाने पाणी पडत आहे. रात्रभर ही टाकी पूर्ण क्षमतेने भरल्यास उद्यापासून शहरात नियमाने आणि मुबलक पाणी शहरवासीयांना मिळणार आहे. तरी पालिकेने काही साठवण टाक्यांमध्ये टँकरने पाणी टाकण्याचा पर्याय सुरू ठेवला आहे. मात्र, सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुसऱ्याही पंपाची वेल्डिंग केलेली पाईप फुटली. त्यामुळे जॅकवेलजवळ पाण्याचे उंचच्या उंच फवारे उडत होते. तत्काळ पाणीपुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे उद्या होणारा नियमित पाणीपुरवठा एक दिवस उशिरा होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular