28.6 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeRatnagiriरत्नागिरीतील पहिले “हार्मोनियम अलंकार" संगीतकार श्री. विजय रानडे

रत्नागिरीतील पहिले “हार्मोनियम अलंकार” संगीतकार श्री. विजय रानडे

ते गेल्या २० वर्षांपासून हार्मोनियम वादन करत असून ते जीजीपीएस शाळेत संगीत शिक्षक आहेत.

रत्नागिरीमध्ये विविध अभ्यासक्रम, क्रीडा, संगीत या क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व यश संपादन केलेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. लहानपणापासून असलेली आवड जोपासताना अनेक जण त्यामध्ये उच्च शिक्षण देखील घेतात. असेच एक श्री विजय रानडे यांनी देखील आपली आवड जोपासत, आपल्या कलेमध्ये विशेष प्राविण्य मिळविले आहे.

रत्नागिरीमधील प्रसिद्ध संगीत शिक्षक, हार्मोनियम वादक, संगीतकार विजय रानडे हे रत्नागिरीतील पहिले “हार्मोनियम अलंकार” पदवीप्राप्त हार्मोनियम वादक म्हणून ठरले आहेत. विजय रानडे यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय (मुंबई) या संस्थेच्या देवल संगीत विद्यालय, (कोल्हापूर) केंद्रात घेतल्या गेलेल्या हार्मोनियम वादनामधील अलंकार या पदवी परीक्षेत हे सुयश प्राप्त केले. यासाठी त्यांनी घेतलेल्या विशेष परिश्रमाचे फळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

एप्रिल महिन्यात ही परीक्षा होती. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विजय रानडे ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. संगीत क्षेत्रात या पदवीला विशेष महत्त्व आहे. हार्मोनियम वादनात विजय रानडे हे जिल्ह्यात अलंकार पदवी प्राप्त पहिले शिक्षक बनले आहेत. त्यामुळे विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

ते गेल्या २० वर्षांपासून हार्मोनियम वादन करत असून ते जीजीपीएस शाळेत संगीत शिक्षक आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक कार्यक्रमांना साथसंगत केलेली आहे. हार्मोनियम वादनाचे बाळकडू व शिक्षण घरातच वडील कै. विनायकबुवा तसेच प्रसिद्ध ऑर्गनवादक कै.पं.तुळशीदास बोरकर यांच्याकडून घेतले. आपल्या वडील व काकांच्या पश्चात रत्नागिरीतील पहिल्या संगीत विद्यालयाची धुरा ते यशस्वीपणे सांभाळत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular