33.2 C
Ratnagiri
Thursday, February 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeChiplunचिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

बहादूरशेखनाका येथील उड्डाणपूल दीड महिन्यांपूर्वी कोसळला होता.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल संदर्भात समितीने चौकशी अहवाल दिल्यानंतर आता कोसळलेले गईर हटवण्याच्या हाताती सुरु झाल्या आहेत. या कामासाठी नागपूर येथील जाणकार एजन्सीची मदत घेण्यात येणार आहे. येत्या आठ दिवसांत प्रत्यक्षात राईर हटवण्याच्या कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नव्याने होत असलेला बहादूरशेखनाका येथील उड्डाणपूल दीड महिन्यांपूर्वी कोसळला होता. उड्डाणपुलाच्या कामात निष्काळजीपणा केल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको केला होता. त्यानंतर उड्डाणपुलाच्या चौकशीकरिता शासनाने तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली होती.

या समितीने अहवाल दिल्यानंतर काही दिवसांपूवीं दिल्ली येथे कोसळलेल्या उड्डाणपुलासंदर्भात प्राथमिक बैठक झाली होती. कोसळलेल्या उड्डाणपुलाचे गर्डर काढणे आणि लाँचर काढण्याचे काम अडचणीचे असल्याने अशी कामे केलेल्या एजन्सीची मदत घेण्याचे ठरले होते. त्यानुसार नागपूर येथील तज्ज्ञ एजन्सीची मदत घेण्यात येणार आहे. त्यास राष्ट्रीय महामार्ग विभागाने मान्यता दिल्याचे सांगण्यात येत आहे. एकाचवेळी उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने गर्डर बसवण्याचे काम करता येते. यासाठी ईगल कंपनीने आणखी एक लाँचरदेखील आणला आहे; परंतु लटकणारे गर्डर जमिनीवर उतरवणे व त्यातील केबल सोडवणे हे अत्यंत कठीण व जिकिरीचे काम आहे.

त्यासाठी एजन्सीचा सल्ला घेणे आवश्यक होता. याबाबत चौकशी समितीने अहवाल दिल्यानंतर आता नागपूरमधील एजन्सीवर ही जबाबदारी सोपवण्यात येणार आहे, तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या कामाला मान्यता मिळाली असल्याने येत्या आठवडाभरात गर्डर हटवण्यास सुरुवात केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून देण्यात आली.

अद्याप ना सूचना ना पत्र – याबाबत ईगल कंपनीच्या व्यवस्थापनाकडे संपर्क साधला असता अद्याप कंपनीला कोणतेही पत्र अथवा सूचना आलेल्या नाहीत. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सूचना येताच कामाला सुरुवात केली जाईल, असे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular