26.3 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

रशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला आज सकाळी साडेआठ वाजता...

लांजा विकास आराखडा रद्द होणार नाही – आमदार किरण सामंत

लांजा विकास आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा समन्वयाची...

सीआरपी महिलांचे रत्नागिरीत धरणे आंदोलन

महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित लोकसंचालित साधनकेंद्रातील...
HomeChiplunकोकण रेल्वेमधील आरक्षित डबे बनलेत जनरल…

कोकण रेल्वेमधील आरक्षित डबे बनलेत जनरल…

गर्दीमुळे शौचालयापर्यंत पोहोचणे तारेवरची कसरत असते.

कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या कोकणकन्या व तुतारी एक्स्प्रेस गाड्यांचे स्लीपर डबे जनरल डबे बनले आहेत. या डब्यांमध्ये वेटिंग लिस्टवर असलेल्या प्रवाशांसह जनरल तिकीट असलेल्या प्रवाशांची घुसखोरी वाढल्यामुळे आगाऊ तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशांना गाडीत शिरणे मुश्कील झाले आहे. रेल्वेच्या मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या आरक्षित डब्यामध्ये वेटिंग लिस्टमधील प्रवाशांना चढण्यास मनाई आहे. अशा प्रवाशांवर दंडात्मक कारवाई अथवा त्यांना गाड्यांमधून उतरवण्यात येते; पण याची अंमलबजावणी कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये होतच नाही. त्यामुळे आगाऊ आरक्षण करून आरामात प्रवास करायला मिळेल, या अपेक्षित असलेल्या प्रवाशांचे हाल होत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसटी येथून रात्री ११ वा. सुटणाऱ्या कोकणकन्या व दादर येथून मध्यरात्री १२.०५ वा. सुटणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसच्या स्लीपर कोच डब्यामध्ये सुरुवातीपासूनच वेटिंग लिस्ट असलेल्या प्रवाशांसह जनरल डब्याची तिकीट काढलेले प्रवासी चढतात.

शौचालयाला जाण्याचे वांदे – मुंबई कोकण प्रवास ९ ते १० तासाचा, त्यामुळे साहजिकच रात्री लघुशंकेला जाणे आवश्यक असते; पण गर्दीमुळे शौचालयापर्यंत पोहोचणे तारेवरची कसरत असते. खाली बसलेल्या लोकांना तुडवत तुडवत कसेतरी शौचालयापर्यंत पोहोचल्यानंतर शौचालयाच्या दरवाज्यावरही अनेक प्रवासी बसले असतात. त्यामुळे दरवाजा उघडणेही अशक्य होते. याचा सर्वाधिक त्रास वयोवृद्ध महिला व मधुमेही रुग्णांना होतो. त्यात शौचालयापर्यंत पोहचण्यासाठी खाली बसलेल्या प्रवाशांची बोलणीही ऐकावी लागतात.

RELATED ARTICLES

Most Popular