33.4 C
Ratnagiri
Wednesday, March 12, 2025

राजापूर तालुक्यात डॉक्टर नियुक्तीमधील धरसोडीमुळे संताप

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर नसताना कंत्राटी...

वर्षभरात जिल्ह्यात १३७ बालकांचा मृत्यू, दोन मातांचाही

जिल्ह्यात मातामृत्यूचे प्रमाण कमी असले तरीही बालमृत्यूचे...

रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचा कायापालट

शासनाच्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमाअंतर्गत सरकारी...
HomeRatnagiriबेकायदेशीर गर्भपाताविषयी माहिती देणाऱ्यास लाखाचे बक्षिस

बेकायदेशीर गर्भपाताविषयी माहिती देणाऱ्यास लाखाचे बक्षिस

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याबाबत माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.

गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान करणे हे पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा आहे. कायद्याचे उल्लंघन करणारी केंद्रे अथवा व्यक्ती तसेच बेकायदेशीर गर्भपाताविषयी नागरिकांनी माहिती कळवावी. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याबाबत माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. व्ही. जगताप यांनी केले आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याबाबत माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. तरी अशा प्रकारचे कृत्य करताना आढळल्यास १८००-२३३-४४७५ या हेल्पलाईन क्रमांकावर तसेच १०४ या क्रमांकावर अथवा www.amchimulgimaha.in या संकेत स्थळावर तक्रार नोंदवावी. तक्रारीची खातरजमा होऊन गुन्हा दाखल झाल्यानंतर माहिती देणाऱ्यास शासनाच्या बक्षीस योजनेअंर्तगत रु. 1 लाखापर्यंत बक्षीस देण्यात येईल. संबंधितांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. तरी असे प्रकार रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular