राजकारण म्हटल कि अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी, अनपेक्षित भेटी घडणे या गोष्टी सर्हास होत असतात. पण दुसर्या पक्षाच्या नेत्याची अचानक घेतलेल्या भेटीने मात्र अनेकांच्या भुवया उंचावतात आणि मग त्यानंतर सुरु होतात त्या अनेक प्रकारच्या अफवा, आरोप – प्रत्यारोप आणि बरेच काही.
असे म्हणतात कि राजकारण्यांना राजकारण कसे करायचे ते सुद्धा कळले पाहिजे. अनेक विरोधी पक्षातील नेते हे कौटुंबिक जिंव्हाळ्याचे संबंध असलेले असतात. पण कार्य प्रसंगी राजकारण बाजूला ठेवून ते आपापसातील हितसंबंध जोपासताना दिसतात. आणि त्या त्या पक्षांचे कार्यकर्ते मात्र त्या गोष्टींवरून वाद घालताना नजरेस पडतात.
अशीच एक घटना गुहागर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार भास्कर जाधव खेड दौऱ्यावर असताना काल त्यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. आमदार जाधव यांच्या या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकदम खळबळ उडाली असून उलट सुलट तर्कवितर्कांना सुरूवात झाली आहे.
भेटीमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली आणि काय चर्चा झाली हे समजू शकले नसले तरी, पण या अचानक घडलेल्या भेटीमुळे रत्नागिरी जिल्ह्यासह खेड व गुहागर तालुक्यामधील राजकीय वर्तुळात मात्र अनेक तर्कविर्तकांना उधाण आले आहे.
घडले असे कि, काल खेड तालुक्यात आमदार भास्कर जाधव रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी या दोन नेत्यांची ही भेट घडली असल्याचे चर्चेत आहे. सदर कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम हे देखील उपस्थित होतेत. त्यानंतर, भास्कर जाधव यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. त्यांना फुलांचा गुच्छ देऊन परिवारास सुद्धा दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. हे दोघे सुमारे अर्धा तास विविध विषयांवर चर्चा करत होते, त्यावेळी संजय कदम यांचे मोठे बंधू सतीश कदम हेही त्यांच्या सोबत उपस्थित होते.