26.1 C
Ratnagiri
Thursday, March 28, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeRatnagiriपथदिपाच्या थकीत बिलामुळे ऐन उत्सवात अंधार पसरण्याची शक्यता

पथदिपाच्या थकीत बिलामुळे ऐन उत्सवात अंधार पसरण्याची शक्यता

पथदिपांचे वीजबील रत्नागिरी नगरपरिषदेने वेळेवर न भरल्यास पथदिपांचे वीज कनेक्शन महावितरण तोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रत्नागिरी शहरातील पथदिपांचे तब्बल ४७  लाख ७५ हजार रुपयांचे वीजबील थकले आहे. पथदिपांचे वीजबील रत्नागिरी नगरपरिषदेने वेळेवर न भरल्यास पथदिपांचे वीज कनेक्शन महावितरण तोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक संस्थांकडून महावितरणची वीजबीले थकीत आहेत. या थकीत वीजबीलांची वसूली रखडल्याने महावितरण मेटाकुटीला आले आहे.

वीजबीले वेळेत भरत नसल्यामुळे महावितरणने आता वीज कनेक्शन तोडून शॉक द्यायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपुर्वीच १  लाख रुपयांचे बील थकीत राहिल्याने स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृहाचे वीजकनेक्शन तोडले होते. त्यानंतर नगरपरिषदेने तात्काळ वीजबील भरल्याने सावरकर नाट्यगृहाचे वीज कनेक्शन पुन्हा सुरु करण्यात आले.

एप्रिल महिन्यापासून रत्नागिरी शहर परिसरामध्ये कनेक्शन असणाऱ्या १८८ पथदीपांचे लाखो रुपयांमध्ये असणारे वीजबिल नगरपालिकेने भरलेलेच नसल्याने ऐन सणा सुदीच्या काळामध्ये रत्नागिरी अंधारात राहणार असल्याची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. महावितरण या प्रकारच्या थकीत बिलांच्या प्रकरणामध्ये कडक कारवाई करत असल्याचे समोर आले असल्याने आणि सोबतच सावरकर नाट्यगृहाचे थकीत वीज बिलाचे प्रकरण ताजे तवाने असल्याने आता पथादिपाच्या थकीत बिलामुळे ऐन उत्सवात मात्र अंधारी पसरणार असल्याचे दिसून येत आहे.

कोरोन काळापासून महावितरणाला अनेक प्रकारे थकीत वीज बिलाची वसुली करताना नाकी नऊ आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कोणतीही संस्था, शासकीय किंवा खाजगी कार्यालये असतील तरी देखील जर वीज बिल थकीत असेल तर महावितरण त्यावर कडक कारवाई करायला मागे पुढे बघत नाही.

RELATED ARTICLES

Most Popular