27.2 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriनेमकं “त्या” युवकाचा घातपात की आत्महत्या!

नेमकं “त्या” युवकाचा घातपात की आत्महत्या!

साहिल मोरे याने केलेल्या आत्महत्या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

मागील काही दिवसांपूर्वी साईभूमीनगर येथे साहील विनायक मोरे वय २४, राहणार अलावा, रत्नागिरी याने गळफास घेत आत्महत्या केली होती. साहिल मोरे याने केलेल्या आत्महत्या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. साहिल मोरे याच्या बहिणीने संशयित मिताली अरविंद भाटकर रा. तोणदे, रत्नागिरी हिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. संशयित मिताली हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

साहिल मोरेला संशयित मिताली भाटकरसोबत लग्न करायचे होते, त्यामुळे तो तिला लग्नाबाबत विचारणा करत होता. पण तीने त्याला लग्नासाठी नकार दिला होता. नकारामुळे आलेल्या नैराश्यामुळे आणि शेवटी आपली आणि आपल्या कुटुंबाची बदनामी होईल, या भितीने साहील मोरे याने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणात आपल्या भावाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्यामुळे साहिल मोरेची बहिण ऋतिका विनायक मोरे वय २८, रा. जाकिमिऱ्या अलावा, रत्नागिरी हिने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संशयित मिताली अरविंद भाटकर रा. तोणदे, रत्नागिरी हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलेल्या तक्रारीनुसार, सकाळी साहिल मितालीला भेटण्यासाठी साईभूमीनगर येथील तिच्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर गेला होता. त्यावेळी मिताली सोबत तिची आरती नावाची एक मैत्रीणही सोबत होती. साहिल हा मितालीला लग्नाबाबत विचारणा करत होता. परंतु, मितालीने त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला होता.

दरम्यान, याप्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल मोरेने घेतलेल्या गळफासामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मांजराच्या गळ्यात घातल्या जाणाऱ्या पट्ट्याने आत्महत्या कशी शक्य आहे? फॅनला हा पट्टा बांधून आत्महत्या केली, पण फॅन खाली कसा आला नाही? आत्महत्या झाली त्यावेळी तिथे कोणी नव्हते, मग यावेळी आत्महत्या करताना ती मैत्रीण कुठे गेली, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. किचनमधील सूरी सापडली असून या सुरीने पट्टा कापल्याचे मैत्रीणीने दिलेल्या जबाबात म्हटले आहे.  याप्रकरणी अधिकची तपास पोलिस उपनिरीक्षक शांताराम महाले करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular