28.7 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

रशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला आज सकाळी साडेआठ वाजता...

लांजा विकास आराखडा रद्द होणार नाही – आमदार किरण सामंत

लांजा विकास आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा समन्वयाची...

सीआरपी महिलांचे रत्नागिरीत धरणे आंदोलन

महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित लोकसंचालित साधनकेंद्रातील...
HomeRatnagiriसंगमेश्वर तालुक्यात विविध कारणांमुळे वन्य जीवांचा मृत्यू

संगमेश्वर तालुक्यात विविध कारणांमुळे वन्य जीवांचा मृत्यू

वन्यप्राण्यांचे आश्रयस्थानच नष्ट होत असल्याने जंगली प्राणी सर्रास मानवी वाडीवस्तीमधे शिरतात.

गेल्या वर्षभरात संगमेश्वर तालुक्यात एकूण सहा बिबटे सापडले. यातील चार बिबटे विहिरीत पडले होते आणि त्यामधील ३ बिबटे मृत झाले असून एका बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे वन विभागाने सोडले. या शिवाय जंगलात दोन बिबटे मृतावस्थेत सापडले. कळंबस्ते, देवधामापूर, मोर्डे,  पिरंदवणे, कनकाडी,  हरपुडे या ठिकाणी हे सगळे बिबटे सापडले होते.

बिबट्यांप्रमाणे गवारेडे सापडण्याचा प्रकारही सुरू आहे. तालुक्यातील नारडुवे, अंबावली, पाचांबे या ठिकाणी गवारेडे विहिरीत पडण्याचा प्रकार घडला. याबाबतची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने या गवारेड्यांना सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. किरबेट येथे झुंजीमध्ये दोन गव्यांचा मृत्यू झाला तर कोंडउमरे येथे कड्यावरून कोसळून एका सांबराचा मृत्यू झाला असल्याची माहिती वनपाल तौफिक मुल्ला यांनी दिली.

संगमेश्वर तालुक्यात गेल्या एका वर्षात विविध कारणांमुळे ५ बिबटे, १ सांबर, ५ गवारेड्यांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तालुका वनविभागाने याला दूजोरा दिला आहे. एकीकडे बिबट्यांचे संवर्धन करा, वन्यप्राण्यांचे रक्षण करा, असे संदेश दिले जात असताना दुसरीकडे मानवाच्या चुकीमुळेच हे मृत्यू होत असल्याने ही बाब चिंता वाढवणारी आहे.

संगमेश्वर तालुक्यात ग्रामीण भागात बेसुमार जंगलतोड सुरू आहे. वन्यप्राण्यांचे आश्रयस्थानच नष्ट होत असल्याने जंगली प्राणी सर्रास मानवी वाडीवस्तीमधे शिरतात. यातून केवळ बिबटेच नव्हे तर गवेरेडेही भरवस्तीत येण्याचे प्रकार वाढत चालले आहे. यातून भक्ष्य म्हणून पाळीव मांजरे, कुत्री, कोंबड्या, गाई, बैल यांच्यावर बिबट्या भरदिवसा हल्ला चढवताना दिसत आहे. तालुक्यात भक्ष्याचा पाठलाग करताना बिबटे विहिरीमध्ये कोसळण्याचे प्रकार घडले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular