23.9 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeMaharashtraकोर्लई गावचे सरपंच मिसाळ यांनी दिले सोमय्या यांना सडेतोड उत्तर

कोर्लई गावचे सरपंच मिसाळ यांनी दिले सोमय्या यांना सडेतोड उत्तर

ठाकरे आणि वायकरांनी जमीन खरेदी केल्यानंतर २०१४ नंतरची घरपट्टी थकली होती. त्यामुळे आम्ही त्यांना रीतसर पत्राद्वारे कळवल

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रश्मी ठाकरेंच्या अलिबाग कोळी भागातील मालकीच्या १९ बंगल्यांचा उल्लेख केला असता, शिवसेना खासदार संजय राऊतांनी अलिबागच्या कोर्लई गावातील रश्मी उद्धव ठाकरेंच्या मालकीचे १९ बंगले दाखवा, असं आव्हान भाजप नेते किरीट सोमय्यांना दिलं होतं. पुढे बोलताना ते म्हणाले कि, सोमय्यांनी बंगले दाखवल्यास मी राजकारण सोडेन. पण त्यांना बंगले दाखवता आले नाहीत, तर मी त्यांना चपलेनं मारेन.

यानंतर आता कोर्लई गावचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगून एक प्रकारे किरीट सोमय्या यांना तोंडघशी पाडले आहे. मिसळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्लई गावामध्ये अन्वय नाईक या व्यक्तीची मालकीची जमीन होती. २००९ साला मध्ये त्यांनी या ठिकाणी काही कच्ची घरं उभारली. पोफळी, बांबूंच्या मदतीनं जोत्यावर ही घरं बांधण्यात आली होती.

नाईक यांचा त्या ९ एकर जागेवर रिसॉर्ट बांधण्याचा मानस होता. मात्र जमीन समुद्रालगत असल्याने सीआरझेडच्या नियमांमुळे त्यांना तिथे रिसॉर्ट उभारणे शक्य होणार नव्हते. त्यानंतर त्यांनी ही जमीन रश्मी उद्धव ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांना विकली. २०१४ मध्ये हा व्यवहार पार पडला, असं प्रशांत मिसाळ यांनी सांगितले.

अन्वय नाईक यांनी त्या जमिनीची घरपट्टी २०१४ पर्यंत भरली होती. पण पुढे जाऊन रिसॉर्ट बांधण्यास परवानगी अशक्य असल्याने त्यांनी जी १८ कच्ची घरं बांधलेली ती देखील मोडून टाकली. आणि त्या जागेवर नारळाची, पोफळीची झाडं लावली. जी आजही त्या जागेत आहेत. ठाकरे आणि वायकरांनी जमीन खरेदी केल्यानंतर २०१४ नंतरची घरपट्टी थकली होती. त्यामुळे आम्ही त्यांना रीतसर पत्राद्वारे कळवल,  यानंतर त्यांनी आरटीजीएसच्या माध्यमातून घरपट्टी भरली. त्याची नोंद ग्रामपंचायतीकडे आहे, असं मिसाळ म्हणाले. ठाकरे आणि वायकर यांच्या नावे असलेल्या जमिनीवर सध्या एकही घर नाही. तिथे केवळ झाडं आहेत, असं मिसाळ यांनी सांगितल.

RELATED ARTICLES

Most Popular