27.3 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeMaharashtraमी माझा पगार संजय राउतांना देतो, त्यात त्यांनी स्वत:चे घर चालवून दाखवावे-...

मी माझा पगार संजय राउतांना देतो, त्यात त्यांनी स्वत:चे घर चालवून दाखवावे- एसटी कर्मचारी

राज्यभरामध्ये एसटी कर्मचार्यांच्या सुरु असलेल्या संपाबद्दल विविध स्तरातून संप मागे घेण्यासाठी मागणी केली जात आहे. सामान्य जनतेची होणारे हाल लक्षात घेता, मुख्यमंत्र्यांनी स्वत: सुद्धा कर्मचार्यांना संप मागे घेण्याबाबत आवाहन केले होते, परंतु अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजून सुरु आहे. आणि जोपर्यंत एसटी चे शासनांत विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा एसटी संपकरी कर्मचार्यांनी शासनाला ठणकावून सांगितले आहे.

खासदार संजय राऊत यांनी एसटी कर्मचारी संपाबाबत एक भाष्य केलं होतं, ‘एसटी कर्मचाऱ्यांचा संप म्हणजे भिंतीवर डोकं आपटून घेण्यासारखं आहे, शिवसेनेची कामगारांना सतत सहानुभूती आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पगार मिळतो त्यावर समाधानी राहावे अस वक्तव्य केल होत. त्यांच्या या विधानाने एसटी कर्मचाऱ्यामध्ये संताप निर्माण झाला आहे.

पण एसटी कर्मचारी यांनी सुद्धा त्यांना एक खुल आव्हान दिले आहे. सोलापुरातील एका एसटी कर्मचाऱ्याने म्हटलं आहे, तुम्ही म्हणता आहे त्या पगारावर भागवा, आम्ही तुमच्याकडे मागीतलंच काय आहे!  मी माझा पगार २५ हजार रुपये संजय राऊत यांना देतो,  त्यांनी स्वतःच तरी घर त्यामध्ये चालवून दाखवावं”, माझी दुसरी काहीही मागणी नाही, अस म्हटलं आहे.

त्याचप्रमाणे संजय राऊत यानी भावना दुखावणारी वक्तव्य करू नये, अशा प्रकारची वक्तव्य करून आणखी आत्महत्या वाढू शकतात, कामगार इकडे आत्महत्या करतोय, राज्यकर्त्यांनी जनाची नाही तर मनाची तरी बाळगावी, असा संताप एसटी कर्मचाऱ्यामधून व्यक्त होत आहे. त्यामुळे जोपर्यंत विलीनीकरणाची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत काही झाले तरी आम्ही कर्मचारी संप मागे घेणार नाही असे स्पष्ट शब्दात एस. कर्मचार्यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular