21.2 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeChiplunमास्टरशेफ पूरग्रस्तांच्या मदतीला सरसावले

मास्टरशेफ पूरग्रस्तांच्या मदतीला सरसावले

कोरोनोने संपूर्ण देश भरड्ला जात असतानाच एका पाठोपाठ एक अशी नवीन नैसर्गिक आपत्ती येत आहेत. मदतीचा हाथ सर्व स्तरातून मिळत आहे. शेफ संजीव कपूर हे ताज हॉटेल्स आणि वर्ल्ड सेंट्रल किचन यांच्या सहकार्याने कोरोनाविरुद्ध अखंडपणे काम करणाऱ्या हेल्थकेअर वॉरियर्सना ताजे पौष्टिक अन्न पुरवत आहेत. अतिवृष्टीने महाराष्ट्रातील चिपळूण आणि महाड भागाला चांगलेच झोड्पून काढले असून, येथील पूरग्रस्त भागामध्ये अन्न पुरविण्यासाठी मास्टर शेफ संजीव कंपूर यांनी शेफ जोस अँड्रेस आणि ताज हॉटेल्स यांनी स्थापन केलेल्या वर्ल्ड सेंट्रल किचनसोबत भागीदारीतून चिपळूण आणि महाड येथील पूरग्रस्त भागात अन्न पुरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून ही टीम ३० जुलै पासून पूरग्रस्तांना दररोज १५,००० थाळी ताजे जेवण पुरविणार आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक पक्ष ते सर्वसामन्य जनता देखील मदत पुरवत आहेत. काही भागातील लोकांना मूलभूत पोषणाच्या गरजा पुरविण्यासाठी अन्नदेखील मिळत नाही. मास्टरशेफ संजीव कपूर या मद्त कार्यासाठी पुढे सरसावले आहेत. अनेक भागामध्ये मुसळधार पावसाने पूरस्थिती उद्भवली, अनेकांचे जीव गेले, तर अनेकांचे संसार उघड्यावर पड्ले, तर काहिंची घरे देखील पुराच्या पाण्याने वाहून गेलीत. त्यामुळेच माणुसकीच्या दिशेने टाकलेले एक लहानसे पाऊल सुद्धा अनेक लोकांच्या जीवनात बदल घडवू शकेल, योग्य वेळी मिळलेली मद्त अशा परिस्थिती मधून बाहेर पडून सावरायला मदत करेल, अशी आम्हाला खात्री आहे, अशी प्रतिक्रिया शेफ संजीव कपूर दिली आहे.

वर्ल्ड सेंट्रल किचनसोबत भागीदारीतून चिपळूण आणि महाड येथील पूरग्रस्त भागातील लोकाना अन्न पुरविण्यासाठी पुढे आले असून, या आपदग्रस्त भागामध्ये दररोज १५,००० जेवणाच्य थाळ्या पुरविणार येणार आहेत, त्याचा आरंभ शुक्रवार पासून करण्यात आला आहे. या भागातील तसेच इतरही पूरग्रस्तांना अन्न पुरवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे अस्ल्याचे मास्टरशेफ संजीव कपूर यानी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular