26.1 C
Ratnagiri
Thursday, August 7, 2025

गणेशोत्सव कालावधीत रेल्वेप्रवासात मिळणार आता उकडीचे मोदक

गणरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना वंदे भारत आणि...

पुनर्वसन वसाहत की, कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंड

मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत पुनर्वसन वसाहत...

महाविकास आघाडीचा महावितरण अधिकाऱ्यांना सज्जड इशारा

दिवसात अनेकवेळा लाईट जात आहे.... तरीपण अवाच्यासवा...
HomeEntertainmentसारा तेंडूलकरची मॉडेलिंगच्या दुनियेमध्ये एंट्री

सारा तेंडूलकरची मॉडेलिंगच्या दुनियेमध्ये एंट्री

सारा तेंडूलकर, मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव म्हणून ज्याची जगभर ख्याती आहे असा  सचिन तेंडुलकर याची मुलगी, आता नवीन क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. ती मॉडेलिंगच्या दुनियेमध्ये प्रवेश करत आहे.

सारा तेंडुलकर नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते आणि कायम चाहत्यांना आकर्षित करत असते. ती सोशल मीडियावर अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते, जे चाहत्यांनाही खूप आवडतात. चाहत्यांना आता मॉडेलिंगच्या दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर तिचा हा नवा अवतारही खूपच पसंतीस उतरला आहे. आपल्या प्रोजेटचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो सध्या खूप व्हायरल होत असून त्याला खूप लाईक्स मिळत आहेत.

नुकतीच ती एका लोकप्रिय कपड्यांच्या ब्रँडशी करारबद्ध झाली आहे. या कपड्यांच्या ब्रँडचा प्रचार करण्यासाठी तिने बनिता संधू आणि तानिया श्रॉफ या अभिनेत्रीं सोबत मॉडेलिंगमध्ये पदार्पण केले आहे. एका प्रमोशनल व्हिडिओमध्ये या तिघी विविध प्रकारचे आकर्षक कपडे परिधान करून, एकत्रित रित्या पोज देताना दिसत आहेत. सारा बर्याचदा तिच्या जिम वर्कआउटचे व्हिडिओ पोस्ट करताना दिसते. अशा परिस्थितीत ती तिच्या मॉडेलिंग करिअरसाठी पूर्णपणे तयार होत असल्याचे निदर्शनास येते.

तिचे शालेय शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पुर्ण केले असून पुढील शिक्षणासाठी ती परदेशामध्ये होती. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनची ती पदवीधर आहे. तिने आता वेगळे क्षेत्र निवडले असून, या मॉडेलिंगच्या क्षेत्रात करत असलेल्या एंट्रीमुळे कुटुंबीय आणि चाहते खूपच उत्सुक आहेत.

हि कायम सोशल मिडिया, जास्त करून इंस्टाग्रामवर खूप सक्रिय दिसते. सध्याच्या घडीला तिचे १.५ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. सारा तेंडुलकर इंस्टाग्रामवर कधी पारंपारिक तर कधी मॉडर्न स्टाईलमधील तिचे फोटो शेअर करत असते आणि चाहत्यांनाही ती खूप प्रसिद्ध देखील आहे. साराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या पहिल्या जाहिरातीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि त्यात ती खूपच आकर्षक दिसत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular