27.9 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeSindhudurgक्रिकेटपटूच्या कुटुंबाला अखेर मिळाले हक्काचे घर

क्रिकेटपटूच्या कुटुंबाला अखेर मिळाले हक्काचे घर

क्रिकेटपटू ''तान्या''च्या निधनानंतर त्यांच्या तीन बहिणी ‘त्या’ झोपडीत राहून स्वतःचा उदरनिर्वाह करत होत्या;

सावंतवाडी येथील क्रिकेटपटू तानाजी कोळेकर यांच्या कुटुंबीयांसाठी ‘सामाजिक बांधिलकी’च्या पुढाकारातून बांधण्यात आलेले घर आज त्यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. शासनाने अनेक गरिबांना घरे दिली; मात्र कोळेकर कुटुंबीयांना सामाजिक बांधिलकीतून हक्काचे घर मिळाले. सावंतवाडी क्रीडाई व अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून हा उपक्रम यशस्वी करू शकलो, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले.

सामाजिक बांधिलकी, राजा शिवाजी चौक मित्रमंडळ, क्रीडाईचे पदाधिकारी, सदस्य आणि इतर दानशूर व्यक्तींच्या उपस्थितीत नूतन वास्तूची पूजा करून कोळेकर भगिनींनी आज आपल्या हक्काच्या घरात प्रवेश केला. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील, क्रीडाईचे अध्यक्ष नीरज देसाई, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, संजय जाधव, विलास जाधव, उमाकांत वारंग, सतीश बागवे, सुभाष गोवेकर, प्रवीण परब, सद्गुरु खोर्जुवेकर, बंटी माटकर, प्रसाद नार्वेकर, समीरा खलील, शेखर सुभेदार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘सामाजिक बांधिलकी’चे रवी जाधव यांनी या उपक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘कोळेकर कुटुंबीय गेली अनेक वर्षे झोपडीत राहत होते. क्रिकेटपटू ”तान्या”च्या निधनानंतर त्यांच्या तीन बहिणी ‘त्या’ झोपडीत राहून स्वतःचा उदरनिर्वाह करत होत्या; मात्र तिघींचे उतार वय, एक बहीण अंथरुणाला खिळलेली अशा परिस्थितीमुळे त्या पूर्णतः खचल्या होत्या.

कोरोना काळात तर त्यांच्यावर उपासमारीचे संकट आले होते. यावेळी अनेकांनी त्यांना अन्नधान्य स्वरुपात मदतीचा हात दिला; मात्र नंतर झालेल्या पावसामुळे त्याचेही नुकसान झाले. त्यामुळे कोळेकर भगिनींना घर बांधून देण्याचा निर्धार केला. ही संकल्पना माजी नगराध्यक्ष साळगावकर यांच्यासमोर मांडल्यानंतर आणि सत्य परिस्थिती कथन केल्यानंतर तेही हेलावून गेले. त्यांनी थेट कुटुंबाला घर बांधून देण्याचे जाहीर केले. छ्प्पराचे काम पूर्ण झाल्यानंतर आर्थिक अडचण आली.

यावेळी साळगावकर यांनी क्रीडाईला आवाहन करताच त्यांनी या कार्यात पुढाकार दिला. त्यानंतर घर उभारण्यासाठी मोहीम सुरू झाली. इतरही अनेक दानशुरांनी पुढे येत मदतीचा हात दिला. अनेक वर्षे काळोखात राहणाऱ्या कोळेकर कुटुंबीयांना प्रकाशमय दिवाळी खऱ्या दिवाळी आधी अनुभवता आली.

RELATED ARTICLES

Most Popular