26.7 C
Ratnagiri
Tuesday, August 5, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeRatnagiriडॉ. मतीन परकार यांनी झालेल्या फसवणुकीबाबत, शहर पोलीस स्थानकात तक्रार केली दाखल

डॉ. मतीन परकार यांनी झालेल्या फसवणुकीबाबत, शहर पोलीस स्थानकात तक्रार केली दाखल

दररोज नवनवीन फसवणुकीच्या घटना कानावर पडत आहेत. मग ते ऑनलाईन फसवणूक, बनावट कॉल्स, इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मिडियावरून फसवणूक, किंवा मग आपल्याच पैशाच्या बाबतीत समोरून झालेली फसवणूक. रत्नागिरीमध्ये हल्ली अशा प्रकारचे गुन्हे वारंवार घडताना दिसत आहेत. पण सतर्क पोलिसांच्या मदतीने अनेक गुन्हे वेळीच उघडकीस येऊन, गुन्हेगारांना वाचक बसतो आहे.

रत्नागिरीतील प्रसिद्ध डॉक्टर मतीन अलीमियाँ परकार यानी स्कोडा गाडीसाठी छत्तीस लाख पन्नास हजार रुपयांची रक्कम भरणा करूनही प्रत्यक्षात गाडी न देता पैशांचा अपहार केला म्हणून त्यांनी नवी मुंबई येथील स्कुडेरिया ऑटोमोटिव्ह  प्रायव्हेट लिमिटेडचे मालक अर्जुन राज यांच्याविरोधात परकार यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे

याबाबत रत्नागिरीतील प्रसिद्ध डॉक्टर मतीन परकार यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की, २९/९/२०२१ रोजी फिर्यादी यांचे वडील अलीमियाँ परकार यांचे नावे नवी मुंबई येथील स्कुडेरिया ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड मध्ये स्कोडा सुपरबी ही गाडी घेण्याकरिता बँक ऑफ इंडिया शाखा शिवाजीनगर रत्नागिरी या खात्यांमधून ३६ लाख ५०,२८० इतकी रक्कम एनईएफटीच्या माध्यमातून कंपनीच्या खात्यात भरणा करण्यात आली. तरी देखील नवी मुंबई येथील स्कुडेरिया ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अर्जुन राज यांनी डॉ. परकार यांना त्यांच्या स्कोडा सुपर बी गाडीची डिलीव्हरी दिली नाही व त्यांनी भरणा केलेल्या रकमेचा देखील अपहार करून फसवणूक केली असल्याची तक्रार दाखल केली आहे. याबाबत अधिकचा तपास शहर पोलीस करीत आहेत. गुन्हेगार काढत असलेले एक एक नवीन फसवणुकीचे फंडे पाहून काही वेळा पोलीससुद्धा चक्रावून जातात.

RELATED ARTICLES

Most Popular