29.5 C
Ratnagiri
Friday, April 3, 2026

​Ratnagiri Earthquake: रत्नागिरी जिल्ह्याला भूकंपाचा सौम्य धक्का; Latest Updates

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी (12 मार्च) रात्री...

समुद्रात सोडलेल्या डॉल्फिनचा अखेर मृत्यू

हर्णै समुद्रकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या एका डॉल्फिनला...
Home Sports विराटच्या मैदानावरील डान्सवर सेहवागची “अशी” कमेंट, चाहते नाराज

विराटच्या मैदानावरील डान्सवर सेहवागची “अशी” कमेंट, चाहते नाराज

कॉमेंट्री करणाऱ्या सेहवागने सोशल मीडियावर चाहत्यांना नाराज करणारी एक कॉमेंट पास केली.

vir seh

भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन पाचव्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाची सुरुवातच जोरदार वादाने झाली. इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्यात मैदानावर वाद झाला. पण बेअरस्टोने स्वत:वर नियंत्रण ठेवत शानदार शतक केले. बेअरस्टोच्या शतकानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू सेहवागने कोहलीवर टीका करत ट्विट करून आपले मत मांडले आहे.

सेहवागने ट्विटमध्ये लिहिले की, कोहलीच्या स्लेजिंगपूर्वी जॉनी बेअरस्टो २१च्या स्ट्राइक रेटने खेळत होता आणि नंतर तो १५० च्या खेळायला लागला. पुजारासारखा खेळत होता, पण कोहलीने विनाकारण स्लेजिंग करून बेअरस्टोला पंत बनवल.

पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रविवारी समालोचन करतानाचा वीरेंद्र सेहवागचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सेहवाग मैदानावर फिल्डिंग करताना विराट कोहलीच्या डान्सवर आक्षेपार्ह टिप्पणी करताना ऐकू येत आहे. मोहम्मद कैफ आणि वीरेंद्र सेहवाग ऑन एअर होते. टीम इंडियाची विकेट मिळाल्यावर कोहली डान्स करत आहे. त्या कोहलीच्या मैदानावरील डान्सवर त्याने “छमिया नाच रे” अशी खालच्या पातळीची कमेंट केली. त्यामुळे कोहलीचे अनेक चाहते नाराज झाले आहेत.

विराटचे नृत्य कौशल्य सर्वज्ञात आहे. आणि अनेक वेळा उत्साहाच्या भरात म्हणा किंवा चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसतो. मात्र या दरम्यान कॉमेंट्री करणाऱ्या सेहवागने सोशल मीडियावर चाहत्यांना नाराज करणारी एक कॉमेंट पास केली. हा व्हिडीओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात काही क्षणातच व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी सेहवागला त्याच्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल माफी मागण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर सेहवागला कॉमेंट्री टीममधून वगळावे अशीही अनेक जणांनी मागणी केली आहे.