23.9 C
Ratnagiri
Thursday, September 19, 2024

विराट कोहली एक हजारी क्लबमध्ये सामील होणार…

यजमान भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या...

या दिवशी थिएटरमध्ये फक्त 99 रुपयांमध्ये चित्रपट पहा…

चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 20...

चाकरमान्यांची कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्गावर गैरसोय

कोकणात सणाच्या निमित्ताने येणाऱ्या जाणाऱ्या चाकरमानी लोकांची...
HomeRatnagiriरत्नागिरीत ७० जनावरांना आसरा, मोकाट गुरांचा लवकरच बंदोबस्त

रत्नागिरीत ७० जनावरांना आसरा, मोकाट गुरांचा लवकरच बंदोबस्त

गणेशोत्सव संपल्यानंतर या मोहिमेला वेग आला आहे.

रत्नागिरी शहरातील मोकाट जनावरांना पकडण्याच्या पालीकेच्या मोहिमेला वेग आला आहे. शहरामध्ये पकडलेली गुरे उद्यमनगर येथील चंपक मैदानावर केलेल्या निवारा शेडमध्ये नेण्यात येत आहेत. आतापर्यंत ७० गुरांना डांबण्यात पालिकेच्या पथकाला यश आले आहे. येत्या काही दिवसात शहर मोकाट गुरे मुक्त होईल अशी आशा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. शहरात फिरणाऱ्या मोकाट गुरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. विरोधकांनीही हा प्रश्न उचलून धरला होता. याची गंभीर दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने जिल्हाप्रशासनाला सूचना दिल्या होत्या.

त्यानंतर मोकाट गुरांना पकडून चंपक मैदानावरील निवारा शेडमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनावर सोपवण्यात आली आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर या मोहिमेला वेग आला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये शहरातील गुरे चंपक मैदानावर नेण्यात येत आहेत. या धरपकड मोहिमेसाठी १५ जणांचे पथक कार्यरत ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी काही कर्मचाऱ्या रत्नागिरी शहरातील दोन ते तिन गुरे रस्त्याने चंपक मैदानापर्यंत नेत होते. प्रत्येकाच्या मागे एक कर्मचारी नियुक्त केलेला होता. ती गुरे इकडेतिकडे जाणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे.

निवारा शेडमध्ये आतापर्यंत ७० गुरांची रवानगी करण्यात यश आले आहे. हा आकडा लवकरच वाढेल असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तिथे ठेवलेल्या गुरांसाठी चाऱ्याची आणि पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, गुरांच्या मालकांना २ हजार रुपये दंड आकरण्याची तरतूद केली आहे. परंतु आतापर्यंत एकही गुरांचा मालक तिकडे फिरकलेला नाही.

RELATED ARTICLES

Most Popular