25 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriभास्कर जाधवांचा शिंदे सरकारवर अचूक निशाणा

भास्कर जाधवांचा शिंदे सरकारवर अचूक निशाणा

या सरकारने १०० रुपयांत आनंदाचा शिध्याचे वाटप करण्याची घोषणा केली. १०० रुपयांत खरचं दिवाळी साजरी होते का?

जिल्ह्यात परतीच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. शेती सर्व पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. काही लोकांचं पिक वाचली परंतु, पाण्यामुळे ते कुजून जात आहे. अशावेळी सरकारने आनंदाचा शिधा देण्याचा मोठा गाजावाजा केला. ते आपली पाठ आपणच थोपटून घेत आहेत, आनंदाच्या शिधावर स्वत:चे फोटो छापल्यावरुन देखील भास्कर जाधवांनी शिंदे सरकारवर अचूक निशाणा साधला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले कि, या सरकारने १०० रुपयांत आनंदाचा शिध्याचे वाटप करण्याची घोषणा केली. १०० रुपयांत खरचं दिवाळी साजरी होते का? आणि तो सुद्धा दिवाळी संपली तरी अपुराच उपलब्ध होता. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात दुखावला गेला आहे. १०० रुपयांची दिवाळी भेट देऊन त्यांच्या जखमेवर डागणीच दिली आहे. तर काही मंत्री स्वतः शिधा वाटप करत होते. पण,  शिधा वाटप हे दिवाळी सण करणाऱ्यांची कुचेष्टाच आहे, अशी बोचरी टीका भास्कर जाधव यांनी यावेळी केली.

राज्यातील शेतकरी पावसाच्या संकटामुळे अडचणीत सापडला आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची वाताहत झाली आहे. शेतकऱ्यांचं शेतात पाणीच पाणी झाल्याने पिक कुजून जात आहे. अतिवृष्टी, परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानाने शेतकरी अडचणीत सापडला आहे. आणि असे असताना शंभर रुपयात या सरकारने दिलेली दिवाळी भेट केवळ शेतकऱ्याची गरिबांची केलेली कुचेष्टा असल्याची टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. शेतकरी पूर्णपणे उद्धवस्त झाला आहे मात्र सरकारनं शेतकऱ्यांच्या दु:खावर डागणी दिली आहे. सोबतच मदत करताना आनंदाचा शिधा पाकिटावर स्वतःचे फोटो देखील छापले आहेत. सरकारने आनंदाचा शिधा देण्याचा मोठा गाजावाजा केला. पण अद्याप शिधा अपुराच उपलब्ध झाला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular