28.6 C
Ratnagiri
Thursday, March 30, 2023
HomeSindhudurgआंबे चोरीच्या संशयावरून नग्न करून मारहाणीचा व्हिडियो व्हायरल

आंबे चोरीच्या संशयावरून नग्न करून मारहाणीचा व्हिडियो व्हायरल

वेंगुर्ला उभादांडा-वरचेमाडवाडी येथे रात्री ११ वाजता आंबा चोरी केल्याच्या संशयावरून तिघांना मारहाण झाली.

कोकण आणि आंबा हे प्रकरणच वेगळे. सध्या सुरु असलेया आंब्याच्या मोसमामध्ये अनेक ठिकाणी दिवसा ढवळ्या देखील चोरीच्या घटना घडताना दिसत आहेत. अशा चोरांना पकडण्यासाठी बागायतदारांनी पोलीस आणि जिल्हाधिकार्यांना देखील निवेदन दिले होते.

सिंधुदुर्गामध्ये आंबा चोरी संशयावरून जातीवाचक शिवीगाळ करत तिघांना नग्न करून अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढ्यावरच न थांबता त्या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. हा अतिशय निंदनीय प्रकार वेंगुर्लेमध्ये घडलेला त्या व्हिडियोमुळे समोर आला आहे. पोलिसांनी गौतम वेंगुर्लेकरच्या तक्रारी वरून संशयितां विरोधात अॅट्रासिटीसह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून फरार झालेल्यांचा शोध कसून पोलीस घेत आहेत.

वेंगुर्ला उभादांडा-वरचेमाडवाडी येथे रात्री ११ वाजता आंबा चोरी केल्याच्या संशयावरून तिघांना मारहाण झाली. नग्नावस्थेमधील मारहाणीचा व्हिडिओही व्हायरल केला. सदर घटनेची दखल सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घेत या घटनेप्रकरणी वेंगुर्ले पोलीसांनी चौकशी करून कारवाईच्या सुचना देण्यात आल्या होत्या.

जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या सुचनेनुसार वेंगुर्ले पोलिसांनी गौतम वेंगुर्लेकर याच्या तक्रारीची दखल घेतली. या तक्रारीत त्यांनी कोणतेही कारण नसताना आंब्याच्या चोरीचा आळ करत, आपणास नग्न करून मारहाण केली गेली आणि त्या मारहाणीचा व्हिडिओ बनवल्याचं म्हटलं आहे. हा मारहाणीचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल केला. बरोबरच जातीवाचक बोलून अपमान केल्याचे नमुद केले आहे.

तसेच, या तक्रारीत मारहाण करणाऱ्या संशयिताची नावे सुध्दा दिली आहेत. त्यामध्ये प्रसाद मांजरेकर, प्रतिक धावडे, रावशा शेलार, गौरव मराठे, नयन केरकर, दिनेश गवळी, योगी सरमळकर यासह १० ते १२ जणांचा समावेश आहे. या तक्रारीवरून वेंगुर्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती रोहिणी साळुंखे करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular