23.3 C
Ratnagiri
Monday, February 6, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeEntertainmentलवकरच सिंघम ३ वर काम सुरू करणार - रोहित शेट्टी

लवकरच सिंघम ३ वर काम सुरू करणार – रोहित शेट्टी

सिंघम ३ मध्ये दीपिका लेडी सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे. पुढच्या वर्षी आम्ही या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहोत.

रोहित शेट्टी त्याचा आगामी चित्रपट सिंघम ३ वर लवकरच काम सुरू करणार आहे. दरम्यान, दीपिका आपल्या चित्रपटात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. वास्तविक, आज म्हणजेच ८ डिसेंबर रोजी रणवीर सिंगच्या सर्कस चित्रपटातील ‘करंट लगा’ गाणे लाँच करण्यात आले, जिथे रणवीर, दीपिका आणि रोहित शेट्टी तिघेही लॉन्चसाठी पोहोचले. कार्यक्रमा दरम्यान रोहित शेट्टीने सांगितले की, ते लवकरच सिंघम ३ वर काम सुरू करणार आहे.

कार्यक्रमात मीडियाशी संवाद साधताना रोहित म्हणाला- ‘लोक मला विचारतात की तुमच्या पोलिस विश्वात महिला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका कोण साकारणार आहे. तर आज मी तुम्हाला सांगतो की सिंघम ३ मध्ये दीपिका लेडी सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे. पुढच्या वर्षी आम्ही या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहोत.

या घोषणेनंतर रणवीर म्हणाला- ‘दीपिकाने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण चेन्नई एक्सप्रेसमधील मीनम्माची भूमिका माझ्यासाठी खूप खास आहे. रोहित शेट्टी आणि दीपिका एकत्र काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. सिंघम २ ला मिळत असलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल मी अतिशय आंनदी आहे.

रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये सिंघम, सिंघम रिटर्न्स, सिम्बा आणि सूर्यवंशी सारखे चित्रपट आहेत. सिंघम फ्रँचायझीमध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. दीपिका देखील या फ्रँचायझीचा एक भाग असणार आहे, अशी अपेक्षा आहे की हा चित्रपट २०२३ च्या उत्तरार्धात प्रदर्शित होईल.

RELATED ARTICLES

Most Popular