22.1 C
Ratnagiri
Saturday, December 20, 2025

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाडया

ख्रिसमसची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या...

बेकायदेशीर वाळू उपसा होताना दिसल्यास कारवाई होणार – जिल्हाधिकारी आक्रमक

बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत आलेल्या तक्रारीवरून आम्ही संगमेश्वरमध्ये...

रत्नागिरी शहरात भरवस्तीत बिबट्याच्या संचाराने घबराट

रत्नागिरी शहराच्या अगदी मध्यवर्ती आणि रहिवासी भाग...
HomeRatnagiri'स्मार्ट मीटर'चा भार ग्राहकांवर नाही - महावितरण

‘स्मार्ट मीटर’चा भार ग्राहकांवर नाही – महावितरण

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांत स्मार्ट मीटरना विरोध करण्यात येत आहे.

महावितरणमार्फत बसवण्यात येणाऱ्या टीओडी स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या वीजवापराची माहिती दर तासानुसार (रिअल टाइम उपलब्ध होत आहे. यामुळे ग्राहकांचे त्यांच्या वीजवापरावर व पर्यायाने वीज बिलावर नियंत्रण राहणार आहे तसेच अचूक व वेळेत बिल मिळणार आहे. टीओडी टाइम ऑफ डे स्मार्ट मीटर हे पूर्वीप्रमाणेच पोस्टपेड असून, मीटर रीडिंगनुसारच त्याचे बिल देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांवर कोणताही खर्चाचा भार नाही. हे मीटर ग्राहकांच्या फायद्याचे असून, ग्राहकांनी अफवांना बळी पडू नये. हे मीटर बसवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. कोकण परिमंडलात सध्या नवीन वीज जोडणीकरिता टीओडी स्मार्ट मीटर वापरण्यात येत आहेत तसेच वीज ग्राहकांचे पूर्वीचे जुने मीटर हे टीओडी स्मार्ट मीटरद्वारे बदलण्यात येत आहेत. टीओडी स्मार्ट मीटर बसवण्याच्या करारानुसार, ठेकेदाराने मीटर बसवून या मीटरची देखभाल दहा वर्षे करायची आहे.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांत गैरसमजातून ग्राहकोपयोगी टीओडी स्मार्ट मीटरना विरोध करण्यात येत आहे. हे अद्ययावत मीटर बसवल्याने महावितरणची वाणिज्यिक हानी कमी होणार आहे तसेच वीज चोरीवर नियंत्रण येणार आहे. त्यामुळे होणाऱ्या महसूलवाढीतूनच टीओडी स्मार्ट मीटरचा खर्च भागवण्यात येणार आहे. सध्याचे मीटर व टीओडी स्मार्ट मीटर यांच्यातील फरक उपयुक्तता समजावी म्हणून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मंडलातील विविध कार्यालयात डेमो पीस लावण्यात आले आहेत.

ग्राहकांच्या मोबाईलवर बील उपलब्ध – टीओडी स्मार्ट मीटरमधून वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक युनिटची रिअल टाईम माहिती ही ग्राहकास मोबाईलवर उपलब्ध होत आहे. त्यामुळे वीजवापरानुसार रीडिंग येत नसेल, तर ग्राहकास हे कळणार आहे. बसवण्यात येणारे टीओडी स्मार्ट मीटर हे राष्ट्रीय मानांकन प्राप्त लॅबमधून चाचणी केलेले असल्याने ग्राहकांना वापराइतकेच वीजबिल मिळत आहे. अत्यंत नावीन्यपूर्ण अशी पारदर्शी सुविधा वीजग्राहकांना नव्या टीओडी स्मार्ट मीटरमुळे मिळत आहे.

टीओडी’ सुविधा गरजेची – राज्यात सुरू असणाऱ्या रूफ टॉपसोलर, मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना आदी योजनांमुळे दिवसा स्वस्त दरात वीज उपलब्ध होत आहे. भविष्यात दिवसा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणारी वीज वापरली जावी, यासाठी औद्योगिक ग्राहकांच्या 4 धर्तीवर घरगुती ग्राहकांनाही दुपारच्यावेळी वीजदरात ८० पैसे ते १ रुपयादरम्यान सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव वीजनियामक आयोगाने मंजूर केला आहे. सध्या बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरमध्ये टीओडी (टाईम ऑफ डे) ही सुविधा उपलब्ध असून, ग्राहकांना स्वस्त वीजदराचा फायदा होत आहे. जुन्या मीटरमध्ये टीओडी ही सुविधा नसल्याने ग्राहकांना दिवसा स्वस्त वीजदराचा फायदा मिळणार नाही.

RELATED ARTICLES

Most Popular