29.5 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriरत्नागिरीची झालेली अवस्था पाहता बदल आवश्यक

रत्नागिरीची झालेली अवस्था पाहता बदल आवश्यक

केवळ मतदानासाठी दिशाभूल करणार्यांना पुढे मतदान करायचे कि नाही?

रत्नागिरी आणि खड्ड्यांची चर्चा सर्व दूर पसरली आहे. रत्नागिरीच्या विकासाच्या नावाखाली अनेक प्रकल्प सुरु आहेत. परंतु पाईपलाईनच्या कामासाठी, जमिनीखालून यंत्रणा करण्यासाठी सर्व रत्नागिरी खोदून काढलेली आहे. रस्त्यात पडलेले खड्डे बुजवण्यासाठी बरेच महिने काम सुरु असून सुद्धा अजून काहीच परिणाम झालेला नाही. रस्त्यांची झालेली चाळण आणि वाहनचालकांना होणारा त्रास पाहता, रत्नागिरीकरांची हालत बेकार होत चालली आहे.

रत्नागिरी शहरातील रस्त्यांची झालेली डळमळीत अवस्था पाहता, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, पाईपलाईनच्या नावाखाली ठेकेदाराने मधोमध खोदलेले खड्डे या साऱ्याला जनता वैतागलेली दिसत आहे. सध्या प्रत्येक रत्नागिरीवासियांची अवस्था सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी झाली आहे.

सध्या तर या रस्त्यावरून चालणे कठीण बनले आहे. त्यामुळे शहरामध्ये एका विशेष लक्षवेधी फलकातून आपला रोष व्यक्त करण्यात येतो आहे. सगळीकडे या विशेष बोर्डची चर्चा सुरू आहे. रत्नागिरी शहरामध्ये ठिकठिकाणी “मी रस्ता बोलतोय, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त मतदान विचार करून करा” हा बोर्ड सर्वांचा लक्ष वेधून घेत आहेत.

केवळ मतदानासाठी दिशाभूल करणार्यांना पुढे मतदान करायचे कि नाही? या बोर्डवरून सत्ता परिवर्तनाची सुरुवात तर नसेल ना अशा प्रकारच्या चर्चा सध्या शहरात चालू आहेत. या बोर्ड मधून नेमकं काय सांगायच आहे हे रत्नागिरीकरांना चांगलंच लक्षात आले आहे, तसेच येणारा काळच याची प्रत्यक्ष कृतीमध्ये त्याचे उत्तर देऊ शकतो अशी सगळीकडे चर्चा सुरू आहे. कारण रत्नागिरीची अशी झालेली अवस्था पाहता नक्कीच बदलाची गरज आहे.

RELATED ARTICLES

Most Popular