22.2 C
Ratnagiri
Thursday, February 6, 2025

ना. नितेश राणे आता भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री...

पुन्हा केवायसीचा कार्डधारकांमागे ससेमिरा, शिधापत्रिकाधारकांतून नाराजी

रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून...

पालू लघुपाटबंधारे योजनेला मंजुरी, किरण सामंत यांचा पुढाकार

उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या...
HomeKokanएक आगळी वेगळी धुळवड, कोकण रेल्वेच्या सारथ्यांसोबत

एक आगळी वेगळी धुळवड, कोकण रेल्वेच्या सारथ्यांसोबत

प्रवाशांना सुखरूप गावी सोडणार्‍या लोकोपायलट यांच्या सोबत धुळवड साजरी करण्यात आली.

कोकणामध्ये सगळे सण एकदम उत्साहात साजरे केले जातात. आणि सध्या तर शिमग्याचा उत्सव कोरोनाच्या दोन वर्षानंतर एकदम उत्साहाने सुरु आहे. होळी आणि धुळवडच्या लागोपाठ सुट्ट्या आल्याने मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी दाखल झाले होते. एसटीचा संप असल्याने अनेकांचा प्रवास रेल्वेने झाला. अनेक गावांमध्ये होम पेटला कि त्याच्या दुसर्या दिवशी धुळवड खेळतात. आणि कोकणामध्ये तर सर्वच सण एकजुटीने सर्वांसोबत खेळले जातात.

अगदी लांब पल्ला पार करून कोकणात रेल्वे गाडी घेऊन येणाऱ्या आणि प्रवाशांना सुखरूप गावी सोडणार्‍या लोकोपायलट यांच्या सोबत धुळवड साजरी करण्यात आली. निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने लोको पायलट तानाजी भाळ आणि त्यांचे सहाय्यक लोकोपायलट यांच्या सोबत धुळवड साजरी केली. तसेच या लोकोपायलटना प्रसाद म्हणून खाऊ देण्यात आला. हे आदरातिथ्य पाहून रेल्वे कर्मचारी अतिशय भारावून गेले.

शिमगोत्सव आणि गणेशोत्सव म्हटला की,  चाकरमान्यांना वेध लागतात ते गावाचे. शिमगा आला की मुंबईत राहणारे हजारो चाकरमानी आपल्या गावाकडे शिमगोत्सव साजरा करण्यासाठी जात असतात. या सर्व चाकरमान्यांना सुखरूप त्यांच्या इच्छित ठिकाणी सोडण्यासाठी आपली कोकण रेल्वे सतत तत्पर असते. प्रवासात विघ्न येऊ नये म्हणून ही कोकण रेल्वे चालविणारे लोको पायलट आणि त्यांचे सहाय्यक लोको पायलट प्रचंड मेहनत घेत असतात.

आपल्या प्रवाशांना वेळेत आणि व्यवस्थित घरी सोडणार्‍या या लोकोपायलट व त्यांचे सहाय्यक उपकाराची जाण ठेवून पत्रकार संदेश झिमण आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ठाणे रेल्वेस्थानकात जाऊन मांडवी एक्स्प्रेस चालविणार्‍या तानाजी भाळ आणि सहाय्यक लोकोपायलट यांच्या सोबत धुळवट साजरी केली. यावेळी धुळवडीचा बच्चे कंपनीनेसुद्धा आनंद लुटला.

RELATED ARTICLES

Most Popular