27.1 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeRatnagiriमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी एस.टी बसेस, विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्यास आंदोलन

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी एस.टी बसेस, विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्यास आंदोलन

लांजा तालुक्यातून १४५ बसेस सोडण्यात आल्या.

रत्नागिरी येथे बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला लांजा आगरातून १४५ बसेस वळविण्याचा निर्णयाविरुद्ध लांजा महाविकास आघाडीच्यावतीने आगार व्यवस्थापक यांना निवेदन देऊन लांजा तालुक्यातील एसटी बसेस बंद करण्यास विरोध केला आहे. बुधवारी शालेय विद्यार्थ्यांच्या एसटी फेऱ्या बंद झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दि. १८ ऑगस्ट रोजी रत्नागिरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रम ासाठी लांजा तालुक्यातून १४५ बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळताच लांजा तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी लांजा एस.टी आगार येथे धडक देऊन डेपो मॅनेजर काव्या पेडणेकर यांची भेट घेतली.

लांजा आगारातून एकही बस बंद रद्द करून शालेय विद्यार्थी, व्यापारी, प्रवासी व नागरिकांची गैरसोय झाल्यास लांजा बस स्थानकात सकाळी ठिय्या आंदोलन करण्यात येईल व कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी लांजा आगार प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देणारे निवेदन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत जाधव, काँग्रेस तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्टे, शिवसेना शहरप्रमुख नागेश कुरूप, काँग्रेस शहराध्यक्ष रवी राणे, काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष घनिता चव्हाण, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मोहमद पावसकर आंदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular