एस. टी. महामंडळाने १ जानेवारी पासून ऑनलाईन आरक्षण प्रणाली आद्ययावत करुने नव्याने सुरु करण्यात आलेल्या तिकीट आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळते आहे. १ जानेवारी ते २० मे पर्यंत सुमारे १२ लाख ९२ हजार तिकीटाची विक्री या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून झाली आहे. याच काळात मागील वर्षी ९ लाख ७५ हजार तिकीटांची विक्री झाली होती म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या सुमारे ३ लाखाने जास्त आहे. सध्या या ऑनलाईन आरक्षण प्रणालीव्दारे दररोज १० हजारं तिकीटे काढली जात असल्याची माहिती एस. टी. महामंडळाच्या वतीने देण्यात आली.
प्रवाशांना घरबसल्या एसटीचे तिकीट उपलब्ध करुन देण्याच्या उददेशाने एसटीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सोय केली आहे. तसेच मोबाईल (भ्रमणध्वनी) वर अॅपच्या माध्यमातून देखील प्रवाशांना तिकीट काढता येते. या दोन्ही पध्दतीव्दारे तिकीट काढण्याच्या प्रणालीमध्ये १ जानेवारी, २०२४ पासून अमुलाग्र बदल करुन त्या अद्ययावत करण्यात आल्या. ऑनलाईन तिकिट प्रणालीतील त्रुटी दूर केल्याने प्रवाशांना तिकिट प्रक्रिया सोपी व सुलभ झाली आहे. त्यामुळे ऑनलाईन तिकिट काढण्याकडे एस. टी. महामंडळाच्या प्रवाशांचा कल वाढतो आहे.
तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी फोनची सुविधा – ऑनलाईन आरक्षण करताना प्रवाशांना तांत्रिक अडचण आल्यास ७७३८०८७१०३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन एस. टी. महामंडळाने केले आहे. नंबर प्रवाशांना तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी २४ तास सुरु असणार आहे. तसेच ऑनलाईन आरक्षण करताना पैसे भरुन देखिल तिकीटे न येणे (पेमेंट गेट वे. संदर्भात) या तक्रारींसाठी ०१२०- ४४५६४५६ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आहे. ऑनलाईन तिकिट प्रणालीद्वारे प्रवाशांना अमृत जेष्ठ नागरिक, जेष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग व्यक्ती अशा विविध सवलतीचे देखिल आगाऊ आरक्षण मिळु शकते.