24.4 C
Ratnagiri
Thursday, December 12, 2024
HomeRatnagiriजेटीमधून आपत्कालीन परिस्थितीत एसटी प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्याची मागणी

जेटीमधून आपत्कालीन परिस्थितीत एसटी प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्याची मागणी

या घाटाला पर्यायी मार्ग नसल्याने मंडणगड, दापोली, खेड या आगाराची चिपळूण, रत्नागिरी या मार्गावर जाणारी बससेवा वारंवार बंद करावी लागत आहेत.

वाहतुकीच्या दृष्टीने आणि अति वृष्टीमुळे दरड कोसळत असल्याने परशुराम घाट हा धोकादायक बनला असल्याने, शासन निर्णयानुसार या मार्गावरची अवजड वाहतूक तब्बल आठ दिवस बंद ठेवण्यात आली आहे. या घाटाला पर्यायी मार्ग नसल्याने मंडणगड, दापोली, खेड या आगाराची चिपळूण, रत्नागिरी या मार्गावर जाणारी बससेवा वारंवार बंद करावी लागत आहेत. त्यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण असलेले दाभोळ, या भागातील लोकांना रत्नागिरीमध्ये विविध शासकीय कामकाजासाठी ये-जा करावी लागते. परंतु, घाट मार्गच बंद करण्यात आल्याने दुसरा कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने शासकीय कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ सर्वांनाच समस्या निर्माण होत आहेत.

त्यामुळे यावर काहीतरी तोडगा काढावा यासाठी जेटीमधून प्रवास करावा. याबाबत स्थानिक एसटी प्रशासनाला विचारले असता त्यांनी जेटीमधून प्रवासी वाहतुकीला परवानगी नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नुकताच सुरु झालेला पावसाळा आणि गणेशोत्सव नजरेसमोर ठेवून व मुंबई-गोवा महामार्गाची वाईट अवस्था लक्षात घेवून दाभोळ-धोपावे जेटीमधून आपत्कालीन परिस्थितीत एसटी प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात यावी, जेणेकरून प्रत्येक आगारातून काही फेर्‍या रत्नागिरी, चिपळूणकडे ये-जा करतील.

जेटी द्वारे प्रवासी वाहतूक सुरू केल्यास प्रवाशांचा वेळ, पैसा आणि त्रास देखील वाचेल अशी मागणी कोकण एसटी प्रेमी ग्रुपतर्फे एसटीचे महाव्यवस्थापक यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे या मागणीवर एसटी व्यवस्थापक काय विचार करतात आणि शासन दरबारी मागणी मान्य होते का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular