राज्यात कोरोनाची तिसरी लाट ओमीक्रॉनच्या रूपाने धडकली आहे. पण या महिन्या अखेरीस कोरोनाची लाट हळू हळू ओसरत चालल्याचे दिसून येत आहे. एकीकडे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आतापर्यंत मास्क हे अत्यंत प्रभावी शस्त्र ठरले आहे. पण आता कोरोनाची ओसरती लाट पाहता राज्य मास्कमुक्त करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मास्क संदर्भात चर्चा झाली. युरोप, इंग्लंड आणि फ्रान्ससह अनेक देशांनी मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्यानंतर मास्क न वापरण्यासंदर्भात भूमिका घेतलेली असताना आपणही भूमिका घेणार का? अशी चर्चा मंत्रिमंडळात झाली आहे.
राज्यातही मोठ्या प्रमाणावर लसीकरण पूर्ण झाले आहे. युरोप, इंग्लंड आणि फ्रान्ससह अनेक देशांनी मास्क न वापरण्यासंदर्भात भूमिका घेतलेली असताना आपल्याकडे पण हि भूमिका घेतली जाणार का? किंवा घेतल्यास त्याचे परिणाम काय होणार? यावर मोठ्या प्रमाणात चर्चा मंत्रिमंडळात पार पडली. राज्यात मास्क वापरणे आता आवश्यक नसल्याची चर्चा यावेळी झाली. मास्क संदर्भात लवकरच टास्क फोर्सशी चर्चा करणार आहे. टास्क फोर्सच्या निर्णयानंतर मास्क बाबतीत धोरण अवलंबले जाणार आहे.
देशासह राज्यात सध्या ओमीक्रॉन या कोरोना व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील कोविड १९ संसर्गाची परीस्थिती आणि संभाव्य असलेल्या चौथी आणि पाचव्या लाटेची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त या नव्या व्हेरीएंटचे रुग्ण सापडले असल्याने राज्यात निर्बंध कडक करण्यात आले होते. त्यामुळे लगेचच घाईने कोणताही निर्णय न घेता, या सर्वांबाबत सखोल अभ्यास करूनच राज्य सरकार मास्क फ्री राज्य करण्याचा निर्णय घेणार आहे.