अखेर आज सर्व धार्मिक स्थळांवर लखलखत दिसून आला. राज्य सरकारने घटस्थापनेपासून राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतल्याने, दीड वर्षांपासून बंद असलेली मंदिरे अखेर आज उघडण्यात आली आहेत. मात्र, देवदर्शनाला जाण्यापूर्वी भाविकांना कोरोनाचे भान ठेवून नियमांचे पालन करावे लागणार आहे. अनेक मंदिराच्या संस्थांनी भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जाणून घेऊया थोडक्यात.
पहिलं आहे मुंबई येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर येथे दर्शनासाठी त्यांच्या अॅप वरून बुकिंग करावे लागणार आहे. प्रवेशासाठी फक्त ऑनलाईन बुकिंग सुविधा उपलब्ध आहे. शक्यतो ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि गर्भवती महिलांनी दर्शनासाठी येणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक तासाला २५० भाविक बुकिंग करु शकणार आहेत.
दुसर आहे पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर. येथे देवस्थान संस्थेमार्फत भाविकांसाठी दर्शनाची वेळ सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत असणार आहे. रोज दहा हजार भाविकांना मुखदर्शन घेता येणार आहे. त्यासाठी ५ हजार भाविक ऑनलाईन पासद्वारे, तर उर्वरित ५ हजार भाविक ऑफलाईन दर्शनपास मिळण्याची व्यवस्था आहे. कोरोनामुळे फुलं, हार, नारळ आणि प्रसाद नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
तिसर आहे शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर. रोज १५ हजार भाविकानाच दर्शन दिले जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन पासची व्यवस्था केलेली आहे. ज्येष्ठ नागरिक, १० वर्षांखालील मुले आणि गर्भवती महिलाना मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कोरोना लसीकरण पूर्ण झालेल्यानाच प्रवेश स्वीकारला जाणार आहे, किंवा RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अनिर्वाय आहे. सध्या कोविडमुळे प्रसादालय बंद ठेवण्यात आले आहे.
चौथं आहे कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर. मंदिराच्या चार दरवाज्यांपैकी केवळ एकच दरवाजा भाविकांसाठी उघडला जाणार आहे. भक्तांची मर्यादित संख्या आणि सुरक्षितत म्हणून मास्क सक्तीचा केला आहे. मंदिरात प्रवेश घेण्यापूर्वी सर्वांचे थर्मल टेस्टिंग, सॅनिटायझिंग होणार आहे. खण, ओटी, प्रसाद साहित्यावर मनाई करण्यात आली आहे. थेट गाभाऱ्यामध्ये कोणालाही प्रवेश मिळणार नसून, ठराविक अंतर ठेवून पितळी उंबऱ्यापासून दर्शन मिळणार आहे.
पाचवं आहे रत्नागिरीतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे देवस्थान. कोरोना काळानंतर आजपासून शासन निर्देशाप्रमाणे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. ठरवलेली दर्शनवेळ सकाळी ५ ते ७ स्थानिक ग्रामस्थ, ७ ते १२ भाविकांसाठी, दुपारी १ ते ७ भाविकांसाठी, संध्याकाळी ७.३०ते ८.३० भाविकांसाठी अशा वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रत्यक्ष पूजा, अभिषेक, आरती तसेच दैनंदिन महाप्रसाद इत्यादी सेवा भाविकांसाठी बंद राहणार असल्याची माहिती देवस्थानतर्फे देण्यात आली आहे.