24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiri२६ जुलै रोजी परिचर महासंघाचे राज्यव्यापी आंदोलन

२६ जुलै रोजी परिचर महासंघाचे राज्यव्यापी आंदोलन

कोविड काळामध्ये अनेक वैद्यकीय कर्मचारी जीवाची बाजी लावून, अगदी तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. काही जणांचे असलेले मानधन देखील वेळेत मिळत नाही. अशा काही मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हा महिला परिचर महासंघाच्या वतीने आज रत्नागिरीचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन पाटील यांना राज्यव्यापी आंदोलनाची नोटीस वजा निवेदन सादर करण्यात आले. २६ जुलै रोजी करण्यात येणाऱ्या राज्यभरातील आंदोलनाची नोटीस राज्य परिचर महासंघाच्या अध्यक्षा मंगला मेश्राम यांनी शासनाला सादर केली आहे.

राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या महिला परिचर वर्गाने राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने राज्य महासंघाचे अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांच्या आदेशानुसार रत्नागिरीतून जिल्हा परिषद लिपीक संघटना राज्य कार्याध्यक्ष तथा प्रशासन अधिकारी संघटना राज्य प्रवक्ते संजय नलावडे यांनी महिला परिचर वर्गाला मागर्दशन करून जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या समवेत भेट घडवून दिली.

जिल्हाधिकारी डॉ.बी. एन. पाटील यांनी त्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव पाहता जिल्ह्यातील परिचर वर्गाने आपल्या जिल्ह्यात प्रशासनाला आणि आरोग्य विभागाला सहकार्य करावे. त्याचप्रमाणे आपल्या रास्त मागण्याचे निवेदन शासनाकडे तातडीने पाठवत असल्याचे सांगून, परिचर महासंघाच्या महिला प्रतिनिधीना आश्वस्त केले. यामुळे परिचर प्रतिनिधीनी समाधान व्यक्त केले आहे.

सदर निवेदन सादर करताना जिल्हा अध्यक्ष आकांक्षा कांबळे, मनिषा जाधव, समृद्धी भाटकर, देवयानी राऊत, सचिव सुप्रिया पवार, कल्पना नार्वेकर, स्मिता पडयार, अश्विनी घडशी आणि मार्गदर्शक प्रशासन अधिकारी संघटना प्रवक्ते तथा लिपीक वर्गीय संघटना राज्यकार्याध्यक्ष संजय नलावडे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular