26.3 C
Ratnagiri
Tuesday, April 22, 2025

खराब तापमानामुळे सागरी मासेमारीवर परिणाम

सर्वसाधारणपणे गुढीपाडवा झाला की समुद्रात नव्याने मासळी...

शेकाप नेत्याच्या दोन मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे...

रत्नागिरीत खेडशी परिसरात उपयुक्त पाळीव प्राणी मुंडकं छाटलेल्या स्थितीत सापडल्याने संताप

रत्नागिरी तालुक्यात रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर खेडशी...
HomeMaharashtraबारामती एमआयडीसीमध्ये आयकर विभागाची छापेमारी

बारामती एमआयडीसीमध्ये आयकर विभागाची छापेमारी

अजित पवार म्हणाले आहेत की,  होय माझ्याशी संबंधित कंपन्यांवर आयटीने धाडी टाकल्या आहेत.

बारामतीत आज सकाळी आयकर विभागाकडून धाड सत्र सुरू आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकाच खळबळ उडाली आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले आहेत की,  होय माझ्याशी संबंधित कंपन्यांवर आयटीने धाडी टाकल्या आहेत.

आयटीने कुणावर छापेमारी करावी हा त्यांचा अधिकार आहे,  त्यांना काही शंका आल्यावर त्यांना  छापेमारी करण्याचा अधिकार आहे. माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांवर छापेमारी झाली आहे, असं अजित पवार यांनी असे स्पष्टीकरण दिले आहे.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, मी नियमित टॅक्स भरतो. अर्थमंत्री असल्याने माझी स्वतः:ची हि नैतिक जबाबदारी असून आर्थिक शिस्त कशी लावायची, कुठलाही कर न चुकवाट, वेळेत भरायचा, टॅक्स कसा भरायचा असतो हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. माझ्या सर्व कंपन्यांचा टॅक्स वेळच्या वेळेत भरला गेला आहे. परंतु, तरीही कोणी राजकीय हेतूने ही कुरघोडी केली असेल तर हि धाड टाकण्यामागे काय माहिती हवी होती हे केवळ इन्कम टॅक्सलाच माहिती असेही अजित पवार म्हणाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी देखील इन्कम टॅक्स विभागाने कारवाई सुरु केली असल्याची माहिती मिळाली असून, जरंडेश्वर साखर, पुष्प दंतेश्वर शुगर, नंदुरबार दौंड शुगर, आंबलिक शुगर या खासगी साखर कारखान्यांवर देखील कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. आज सकाळपासून आयकर विभागाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली आहे. जे सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याची माहिती मिळाली आहे, त्यातील काही कारखान्यांवर आयकर विभागाची टीम पोहोचली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular