22.4 C
Ratnagiri
Saturday, February 7, 2026

रत्नागिरीत पार्किंगच्या जागेत बाग – स्मार्ट सिटी योजना

शहरातील मारुती मंदिर स्टेडियमच्या बाजूला असणाऱ्या पार्किंगच्या...

विमान अपघाताच्या चौकशीत धक्कादायक बाब आली समोर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला...

शनिवारच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज, पोलिसांचांही तगडा बंदोबस्त

रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक...
HomeLifestyleउन्हाळ्यात खाण्यापिण्याबाबत निष्काळजीपणा, करतो आरोग्यावर परिणाम

उन्हाळ्यात खाण्यापिण्याबाबत निष्काळजीपणा, करतो आरोग्यावर परिणाम

लोकांच्या आहारचे प्रमाण कमी होऊन जास्तीत जास्त फलाहार किंवा पाणीदार बाबींचाच आहार जास्त घेतात.

ऋतूनुसार आपण आपले शरीर आणि पोट थंड ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच साजेसा आहार घेणे आवश्यक आहे. उन्हाळा आला की तहान अधिक प्रमाणात लागते, त्यामुळे लोकांच्या आहारचे प्रमाण कमी होऊन जास्तीत जास्त फलाहार किंवा पाणीदार बाबींचाच आहार जास्त घेतात. पण उन्हाळ्यात खाण्या पिण्याबाबत करण्यात येणारा निष्काळजीपणा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम घडवू शकतो.

उन्हाळ्यात उलट्या, जुलाब, पोटदुखी, गॅस, अपचन अशा पोटाच्या समस्या अधिक जाणवतात. तुम्ही उन्हात घराबाहेर पडता तर तुम्हाला उष्माघातही होतो. आज उन्हाळ्यात कोणत्या भाज्या मुख्यत्वे करून खाव्यात अशा भाज्यांबद्दल जाणून घेऊया, ज्या खाल्यामुळे तुमचे शरीर थंड राहील.

उन्हाळ्यात राजगिरा, पुदिना, पालक यांसारख्या पालेभाज्या खाव्यात. हिरव्या पालोभाज्या तुम्ही सूप, डाळ, पराठा, कोशिंबीर अशा कोणत्याही प्रकारे वापरून खाऊ शकता. हिरव्या भाज्यांमध्ये लोह आणि कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते.

त्याचप्रमाणे आहारात काकडीचा जास्तीत जास्त समावेश करणे गरजेचे आहे. काकडीमध्ये भरपूर पोषक द्रव्ये असतात. काकडीचा वापर सलाड आणि भाजीच्या स्वरूपातही खाऊ शकता. काकडीत पाण्याचे प्रमाण खूप असल्याने उन्हाळ्यात काकडीचे सेवन केल्याने पोट शांत थंड राहते. उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते.

शेवग्याच्या शेंगा सुद्धा खूपच गुणकारी आहेत. पचनक्रियेशी संबंधित आजार शेवग्याच्या सेवनाने नष्ट होतात. यामध्ये भरपूर फायबर असते आणि त्यामुळे पचनक्रिया सुधारते. शेंगामध्ये व्हिटॅमिन के, प्रथिने, लोह, जस्त आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे पोषक असतात.

दुधी भोपळा हा अनेक पोषक तत्वांचा खजिना आहे. उन्हाळ्यात दुधी भोपळ्याची भाजी खाणे खूपच फायदेशीर ठरते. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, ज्याने हाडाना मजबूती येते.

बहुगुणी कारल्याचा रस हृदय आणि पोटासाठी औषधाप्रमाणे काम करतो. जरी चवीने कडू असले तरी खूपच गुणकारी त्याचे उपयोग आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular