25.2 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriपतीचे दुष्कृत्य, माजी सभापती स्वप्नाली सावंत यांची जाळून हत्या

पतीचे दुष्कृत्य, माजी सभापती स्वप्नाली सावंत यांची जाळून हत्या

सावंत पति पत्नींमध्ये कौटुंबिक वाद देखील होते याबाबत पोलीस स्थानकात तक्रारीदेखील झालेल्या होत्या तर काही प्रकरणे न्याय प्रविष्ट आहेत.

रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. स्वप्नाली सावंत यांना बेपत्ता होऊन दहा दिवस उलटल्यानंतरही त्यांचा तपास अद्याप लागलेला नाही. त्यामुळे रत्नागिरी पोलिसांनी सर्व बाजूने तपास सुरू ठेवला आहे. पोलिसांनी दुसर्या दिवशीही मिऱ्या येथील सावंत यांच्या घराचा परिसरात पाहणी केली.  रत्नागिरी पोलिसांनी पती सुकांत सावंत अन्य दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

सावंत पति पत्नींमध्ये कौटुंबिक वाद देखील होते याबाबत पोलीस स्थानकात तक्रारीदेखील झालेल्या होत्या तर काही प्रकरणे न्याय प्रविष्ट आहेत. दहा दिवस उलटूनही स्वप्नाली सावंत यांचा शोध लागत नसल्याने घातपाताची शक्यता असण्याच्या दृष्टीनेही तपास सुरू ठेवण्यात आला आहे. मात्र आत्ता या प्रकरणात पोलिस अंतिम तपासापर्यंत पोहोचल्याचे वृत्त आहे.

स्वप्नाली सावंत यांना जाळून मारण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यामध्ये स्वप्नाली सावंत यांच्या पतीचाही समावेश आहे. पती सुकांत उर्फ भाई सावंत, रुपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत आणि प्रमोद बाबू गावनांक या तिघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. १ सप्टेंबर रोजी कट कारस्थान करून या तिघांनी स्वप्नाली यांना जाळून मारल्याची हादरवून टाकणारी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

जाळून मारल्यानंतर ही राख या संशयित आरोपींनी समुद्रात टाकली होती. त्यामुळे कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. रत्नागिरी शहर पोलिसांनी आपले कौशल्य पणाला लावत या तपासात यश मिळवले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मिऱ्या येथील भाई सावंत यांच्या घरा जवळून पोलिसांनी राख आणली होती. ती तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली आहे.

माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सावंत बेपत्ता प्रकरणात शहर पोलिसांनी या ३ जणांना ताब्यात घेतले. दोघांमध्ये अनेकदा वाद होत असत एकमेकांचे फार पटत नव्हते, अनेकदा प्रकरण हातघाईवर सुद्धा जात असत,  अशी माहिती तपासात पुढे आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular